पेट्रोल पंप ठाणा येथे भिमा कोरेगाव शौर्यदीन साजरा
जवाहरनगर :- पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी १ जानेवारी १८१८ मध्ये इंग्रज, महार रेजिमेंट व पेशवे यांच्या सैन्यात घनघोर लढाई झाली. यात महार बटालियनच्या ५०० शूरवीर सैनिकांनी पेशव्यांच्या ३० हजार सैनिकांचा पाडाव करून विजय मिळविला होता. या लढाईत महार रेजिमेंटच्या अनेक शूर वीरांना वीरमरण आले. या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या शौयचि प्रतीक म्हणून इंग्रजांनी १८२२ मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी ‘विजयस्तंभ उभारला. १९२७ सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह विविध गावात १ जानेवारी भिमा कोरेगाव शौर्यदीन साजरा करतात.अशाच प्रकारे १ जानेवारीला ठाणा पेट्रोल पंप येथील राष्ट्रीय महामार्गावरील जवाहरनगर रोड वरील मुख्य टी पॉइंट चौक येथे आनंद बुद्ध विहार समिती, ठाणा पेट्रोल पंप, जय भीम मित्र मंडळ भंडारा, माजी सैनिक संघटना ठाणा पेट्रोल पंप च्या संयुक्त विद्यमाने
भिमा कोरेगाव शौर्यदीन उपलक्ष विजयस्तंभाची प्रतिकृतीला संगीतमय व जोश पूर्ण वातावरणात मानवंदना देण्यात येऊन,जय जय जयभीम चा गजर देऊन मानवंदना देऊन मोठया थाटात शौर्यदीन साजरा करण्यात आला
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी
आनंद चव्हाण, मोहनिष कांबळे, लांकेश उरकुडे,नितेश रामटेके,सोनू शेंडे व मित्र मंडळ यांचे विषेश योगदान लाभले.
………………