भावाने केली बहिणीची गळा आवळून हत्या.

प्रेम करणे भोवले. ; कुटुंब गेले होते बाहेरगावी लग्नाला
हत्ये नंतर हृदय विकाराचा केला बनाव पण बनाव फार काळ टिकू शकला नाही
भंडारा /प्रतिनिधी
बहिणीचे गावातील युवकासोबत असलेल्या प्रेम संबंधावरून बहीण आणि भाऊ यांच्यात नेहमी वाद व्हायचे.घटनेच्या दिवशी (दि.24 डिसेंबर ) भावाने बहिणीला कोणाशी तरी मोबाईल वर बोलतांना पाहिले आणि त्यांचा संशय बळावला.त्यावरून बहीण आणि भावात कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या भावाने बहिणीचा गळा आवळून खून केला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
उपलब्ध माहिती नुसार मोहाडी तालुक्यातील सोनाली ( वरठी ) येथे बावनकुळे कुटुंब राहते. कुटुंबात भाऊ आशिष गोपीचंद बावनकुळे (22) आणि बहीण अश्विनी (20) सह अन्य सदस्य राहतात. बहीण नेहमी मोबाईल वर बोलत असल्याने बहिणीचे कोणाशी तरी प्रेमसंबंध आहेत अशी आशिष ला शंका होती. त्यावरून दोघात नेहमी वाद व्हायचे.
बहीण मोबाईल वर बोलत असल्याचे पाहून भाऊ संतापला आणि ….. घटनेच्या दिवशी म्हणजे 24 डिसेंबर रोजी बावनकुळे कुटुंबातील सगळे सदस्य बाहेरगावी नात्यात लग्नाला गेले होते. त्यामुळे घरी आशिष आणि अश्विनी एकटेच होते. दरम्यान दुपारी 2.45 वा चे दरम्यान अश्विनी च्या मोबाईल वर कॉल आल्याने ती मोबाईल वर बोलत होती. अश्विन मोबाईल वर प्रियकरा सोबत बोलत आहे असा आशिष ला संशय आला. आणि त्यावरून दोघात वाद सुरू झाला. वाद ईतका विकोपाला गेला की आशिष ने अश्विनीचा गळा दाबला. त्यामुळे गुदमरून अश्विनीचा मृत्यू झाला.
हृदय विकाराच्या झटक्याचा बनाव – अश्विनीचा मृत्यू झाल्याचे समजताच आशिष गोंधळाला आणि आता आपण फसले जाऊ हे लक्षात आल्यावर त्याने अश्विनीचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने खला5 असा बनाव केला. पण तो फार काळ टिकू शकला नाही. पोलिसांना पंचनामा करताना मृतक अश्विनीचा गळ्यावर खुणा आढळुन आल्या,. त्यावरून आशीविणीचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने नव्हे तर गळा आवळून झाल्याचे पोलिसांना समजायला वेळ लागला नाही.