चांदुर रेल्वे येथे भारत जोडो चषक मधे मॉर्निंग क्रिकेट क्लब टीम ने पटकावला पहिला क्रमांक
चांदूर रेल्वे तालुका प्रतिनिधी
स्व भैय्यासाहेब ठाकूर यांच्या स्मृती प्रित्यर्थ युवक काँग्रेस तर्फे जिल्हास्तरीय भारत जोडो चषक टेनिस बॉल क्रिकेट प्रतियोगिता आयोजित करण्यात आली असून सर्व तालुक्यामध्ये पात्रता फेरीचे सामने आयोजीत केले आहे. या अनुषंगाने चांदुर रेल्वे येथील तालुका स्तरीय फेरीत मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाने अंतिम सामन्यात सी आर एलेवेन संघाचा पराभव करून प्रथम पारितोषिक पटकावले. दोन्ही संघ जिल्हा फेरी साठी पात्र ठरले असून चांदुर वॉरियर्स व मांजरखेड क्रिकेट क्लबने सेमी फायनल पर्यंत मजल मारली. मन ऑफ सीरिज अमन ठाकूर, बेस्ट बॅटमॅन शंतनु यादव, बेस्ट बॉलर गोलू शादाब व अंतिम सामन्यात योगेश खेरकर याने सामनावीर पुरस्कार पटकावला. स्पर्धेत येरड, घुईखेड, धनोडी, राजुरा, जळका (जगताप) , पळसखेड, मांडवा, तुळजापूर, डी. सी. सी. मालखेड, सावंगा बु. सोनगाव, येथील संघांनी सहभाग नोंदवला. यावेळी माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश आरेकर, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य अमोल होले, शहराध्यक्ष निवास सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हरिभाऊ गवई, माझी जि प सदस्य प्रवीण घुईखेडकर, माजी संचालक अशोक चौधरी, माजी नगराध्यक्ष शित्तू सूर्यवंशी, प्रभाकरराव वाघ,युवक कॉंग्रेस अध्यक्ष धामनगाव मतदार संघ संदीप शेंडे,रवी देशमुख, सूचक भगत, इंद्रपाल बनसोड, अमीर शेख, नरेश स्थूल उपस्थित होते. स्पर्धे करिता परिक्षीत जगताप,, शाहेजड सौदागर, रुपेश पुडके, सुमेध सरदार, हर्षल वाघ, सन्नी सावंत, पंकज मेश्राम, सारंग देशमुख, प्रफुल कोकाटे, सचिन खंदार, अतुल मकेश्र्वर, अंकित देशमुख, इम्रान सौदागर, करण मेश्राम, राहुल राऊत, गजू मोहिते, अनंत पोलाद, वैभव मलवर, शरद घासले, भिमराव पवार प्रतीक इंगळे यांनी परिश्रम घेतले.