शिक्षण सप्ताह चा समारोप समुदाय सहाय्य भोजनदानाने
रितेश टीलावत
तेल्हारा प्रतिनिधी
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मुलांची शाळा तळेगाव बाजार तालुका तेल्हारा, येथे सोमवारपासून शिक्षण सप्ताह अंतर्गत विविध विद्यार्थी विकासाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यातच आजचा समुदाय भोजन हा कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला ग्रामपंचायत तळेगाव बाजार व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांकडून विद्यार्थ्यांना जेवणाची मेजवानी देण्यात आली. पंचायत समिती सदस्य सन्माननीय मो. इद्रिस भाई मो.कुदुस, तळेगाव बाजारच्या सरपंच,ग्रामपंचायत सदस्य , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, इतर शिक्षण प्रेमी मंडळी यांनी सर्वांनी मिळून समुदाय भोजन स्वतः बनवून विद्यार्थ्यांना खाऊ घातले. यात पोळी, कोवळ्याची भाजी, पुलाव, बुंदीलाडू व फरसाण असे चविष्ट जेवण देण्यात आले. पंचायत समितीचे सदस्य व तळेगाव बाजारच्या सरपंच यांनी विद्यार्थ्यांना स्वतः जेवणाचे वाढ वाढले. सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांना पंक्तीत बसून जेवायला दिले तदनंतर पंचायत समिती सदस्य, सरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य, शिक्षण प्रेमी नागरिक, व्यवस्थापन समिती सदस्य व अन्नदाते यांनी जेवणाचा आस्वाद घेतला यावेळी शाळेतील शिक्षक विलास घोडेस्वार सर, आशिष सदाफळे सर, नारायण वानरे सर , सुनीता चव्हाण मॅडम व शापोआ कर्मचारी गोवर्धनभाऊ बंड या सर्वांनी भरपूर मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी बनविला. अशाप्रकारे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा तळेगाव बाजार येथे शिक्षण सप्ताहाचा समारोप करण्यात आला. शाळेत आज जो समुदाय भोजनाचा कार्यक्रम पार पडला यात ज्या सर्व लोकांनी समुदाय भोजन देण्यास हातभार लावला असं सर्व अन्नदातांचे शाळेच्या वतीने खूप खूप आभार शाळेचे मुख्याध्यापक पवन ठाकूर सर यांनी मानले. भविष्यातही असे सहकार्य आम्हाला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.