हटके

14 वर्षे त्याने तिचा चक्क सेक्स स्लेव्ह म्हणून केला वापर

Spread the love

नवी दिल्ली /नवप्रहार मीडिया नेटवर्क

                  जगात काही लोक असे असतात की त्यांच्या कृतीने ते विक्षिप्त असल्याचा स्वतःच परिचय देतात. एका रशियन व्यक्तीने आपल्या याच विकृत मानसिकतेचा परिचय दिला आहे. त्याने एका तरुणीचे अपहरण करून तिला मागील 14 वर्षांपासून बंदिस्त करून ठेवले होते.तो तिच्यावर वारंवार बलात्कार करायचा. त्याने तिचा वापर सेक्स स्लेव्ह म्हणून केला आहे.

.

व्लादिमीर चेस्कीडोव्ह असं या आरोपीचं नाव आहे. पश्चिम रशियातील चेयोबिन्स्क शहरात राहणाऱ्या व्लादिमीरनं 14 वर्षांपूर्वी एका 19 वर्षांच्या तरुणीचं अपहरण करून तिला आपल्या घरात सेक्स स्लेव्ह म्हणून ठेवलं होतं. यादरम्यान, त्यानं किमान 1000 वेळा या तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.’आउटलेट’नं दिलेल्या वृत्तानुसार, व्लादिमीरच्या तावडीतून सुटलेल्या महिलेनं 14 वर्षांच्या छळाची कहाणी सांगितली आहे. आत्ता 33 वर्षांची असलेल्या या महिलेनं सांगितलं की, 2009 मध्ये व्लादिमीरनं तिचं अपहरण केलं होतं.

त्याच्यावर आणखी एका महिलेची हत्या केल्याचाही आरोप आहे. खून, बलात्कार आणि अपहरणाचे अनेक गुन्हे त्याने केलेले आहेत.रशिया टुडेने तपास अधिकाऱ्यांचा हवाला देत दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, 2009 मध्ये 19 वर्षांची एकॅटरिना आणि व्लादिमीर चेस्कीडोव्ह यांची भेट झाली होती. ड्रिंक घेण्यासाठी त्यानं तिला घरी बोलावलं होतं. एकॅटरिना घरी आल्यानंतर चेस्कीडोव्हने तिला सुऱ्याचा धाक दाखवत हात-पाय बांधून खोलीत बंद केलं.

तो तिच्याकडून घरातील सर्व कामं करून घेत असे.स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीच्या आईनेच एकॅटरिनाला पळून जाण्यास मदत केली. आरोपीची आई व्हॅलेंटिना त्याच घरात राहत होती आणि तिला या प्रकरणाची माहिती होती. एकॅटरिनानं दावा केला आहे की, चेस्कीडोव्हनं ओक्साना नावाच्या आणखी एका महिलेला अंधारकोठडीत मारून तिचे तुकडे केले आहेत. पोलिसांना अंधारकोठडीत मानवी शरीराचे काही अवयवही सापडले आहेत.पीडितेनं पोलिसांना सांगितलं की, सुऱ्याचा धाक दाखवून आरोपी तिच्याकडून घरातील कामं करून घेत असे.

किरकोळ चुकांसाठी तिला वारंवार त्रास दिला जात होता. आरोपीनं तिला अमानुषपणे मारहाण केली आणि अनेकदा शारीरिक यातना दिल्या. तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. ज्या खोलीत तिला ठेवण्यात आलं होते, त्या खोलीत लॅपटॉप आणि डिस्कमध्ये अश्लील चित्रपट तसेच सेक्स टॉईज ठेवलेले होते.तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मानसिकदृष्ट्याही अस्थिर आहे. त्याची प्रकृती खालावल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याच दरम्यान पीडित महिलेला पळून जाण्याची संधी मिळाली. तपास पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळाची तपासणी करत आहेत. स्थानिक वृत्तानुसार, आरोपीच्या वडिलांच्या मृत्यूचीही चौकशी सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close