क्राइम

मुद्रांक विक्रेत्याला मुद्रांकावर अतिरिक्त रक्कम घेणे भोवले..

Spread the love
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई 
छत्रपती संभाजीनगर / विशेष प्रतिनिधी 
                     ग्राहकाकडून मुद्रांकाच्या किंमती पेक्षा जास्त रक्कम घेणे मुद्रांक विक्रेत्याच्या चांगलेच अंगलट आले आहे. एका मुद्रांकावर २० रुपये जास्त मागितल्या प्रकरणी मुद्रांक विक्रेत्याने आगाऊ घेतलेले ५० रूपये एसीबी ने लाच ठरवत मुद्रांक विक्रेत्याला अटक केली आहे.
अलीकडच्या काळात ५० रूपये ही लाचेची  सगळ्यात कमी रक्कम ठरली आहे. बीडमध्ये श्रीनिवास लखमावाडला तब्बल ४५ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी केलेल्या अटकेतील कारवाई ही मोठ्या रक्कमेची ठरली आहे.
वडगाव कोल्हाटी भागाच्या हद्दीतील न्यू सलामपुरेनगरमध्ये बुधवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत लक्ष्मण हिराजी धडेकर (वय ५४) याच्याविरुद्ध ५० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. लक्ष्मण हिराजी धडेकर याने त्याच्याकडे तीन मुद्रांक (बॉण्ड) खरेदीसाठी आलेल्या तक्रारदाराकडे शासकीय किमतीपेक्षा अधिकची रक्कम म्हणून लाच मागितली. तक्रारदाराला १०० रुपयांचे तीन मुद्रांक हवे होते.
मात्र अधिकृत स्टॅम्प विक्रेता असलेल्या लक्ष्मण धडेकरने १०० रुपयांवर प्रति स्टॅम्पपोटी २० रुपये अधिक कमिशन मिळून ६० रुपये जास्तीचे मागितले. तक्रारदाराला लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १९ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली. सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक राजू नांगलोत यांनी सहकारी साईनाथ तोडकर व राजेंद्र सिनकर यांच्या सहकार्याने वाळूजमधील बजाजनगरातील वंदना कम्युनिकेशन येथे कारवाई करत लक्ष्मण धडेकर याला तक्रारदाराकडून ५० रुपयांची लाच घेताना पकडले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close