राष्ट्रवादीच्या यवतमाळ जिल्हा सह पुसद कार्यकारणी जाहीर
राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद/ राष्ट्रवादीच्या विचारातून जनसेवेचा उदात्त हेतू सिद्ध करण्यासाठी यवतमाळ जिल्हा कार्यकारणी सह पुसद शहर व तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यकारणीमध्ये तळागाळातील सर्वसामान्यांची नाळ जुळलेले पदाधिकारी निवडल्याने जनतेमधून आनंद व्यक्त केल्या जात आहे. पद्मविभूषण मा. खा. शरदचंद्र पवार यांच्या विचारानूसार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यात तसेच पक्षाचे ध्येय धोरण सर्व सामान्य पर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्र लीगल सेलचे अध्यक्ष ॲड आशिष देशमुख, जिल्हा निरीक्षक अफजल फारूकी, जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम तथा अमरावती विभागीय अध्यक्ष प्राचार्य सुरेखा देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष म्हणुन साहेबराव यादवराव ठेंगे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश किसनराव धनवे,
सरचिटणीस दीपक लक्ष्मणराव जाधव, जिल्हा सरचिटणीस नाना जळगावकर तर पुसद तालुका अध्यक्ष पदी माधवराव वैद्य, तालुका उपाध्यक्षपदी सिद्दीक लोहार यांची तर शहर अध्यक्ष पदी साकिब शाह जनुल्ला शाह यांना नियुक्ती करण्यात आले आहे. . ॲड आशिषदादा देशमुख यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी दिलेल्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी जनतेच्या सेवेतून व पक्षीय बळ वाढवण्याच्या दृष्टीने कार्यतत्पर राहील अशी ग्वाही नवनियुक्त पुसद शहर अध्यक्ष साकीब शहा यांनी दिली आहे.