वाचा भर दुपारी भगतसिंग चौकात का माजली धावपळ
भर दुपारी दुकानदारांनी पाडले दुकानाचे शटर
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे येथील भगतसिंग चौक म्हटले की सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत माणसं आणि वाहनांनी गजबजलेले चौक. पण काल ( दि. 17) ला दुपारच्या वेळेस अचानक चौकात धावपळ माजली. ज्याला जेथे जागा दिसेल तो त्या दिशेने पळू लागला. दुकानदारांनी दुकानाचे शटर पाडून घेतले. आणि गजबजलेल्या चौकात क्षणात शुकशुकाट पसरला.
भगतसिंग चौक रेल्वे स्टेशन ला लागून असल्याने आणि बाजूलाच यवतमाळ कडे जाणाऱ्या बसेस चा थांबा असल्याने या चौकात नेहमीच वर्दळ असते. पण काल अचानक दुपारच्या सुमारास चौकात धावपळ माजली. जो तो लपण्यासाठी जागा शोधू लागला. त्या गोष्टीचा दुकानदारांनी सुद्धा इतका धसका घेतला की त्यांनी आपल्या दुकानाचे शटर ओढून घेतले. आणि क्षणात चौकात शुकशुकाट पसरला.
त्याचे झाले असे की, चौकात असलेल्या बीएसएनएल कार्यालयात असलेले मधमाशीच्या पोळाला कोणी छेडले. त्यामुळे मधमाश्या सैरावरा उडू लागल्या. आणि भेटेल त्याला चावा घेऊ लागल्या. त्यामुळे चौकात धावपळ माजली प्रत्येक व्यक्ती लपण्यासाठी जागा शोधू लागला. पण मधमाश्या आपल्या दुकानात घुसू नये म्हणून दुकांदारांनी दुकानाचे शटर पाडून घेतले.
– एका महिलेची काही लोकांनी मधमाश्यायाच्या हल्ल्यातून केली सुटका – बाहेर गावावरून आलेल्या लोकांना नेमके काय घडत आहे याची कल्पना नव्हती. इतक्यात चौकात उभ्या असलेल्या महिलेवर हल्ला केला. आणि तिला चावा घेऊ लागल्या.अचानक झालेल्या या हल्ल्याने महिला घाबरली आणि सैरावैरा पळू लागली. मधमाशांच्या हल्ला इतका जबरदस्त होता की महिला अक्षरशः रस्त्यावर नाचू लागली.ही बाब रमण हॉटेल मध्ये काम करणाऱ्या गिरी आणि मुरली भाकरे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिच्या दिशेने पाण्याचा वर्षाव केला.तेव्हा कुठे मधमाश्यांनी तिचा पिच्छा सोडला.
काही दुकानदारांनी केला धूर – मधमाश्या धूर पाहून पळतात हे लोकांना माहीत असल्याने काही दुकानदारांनी माश्या आत येऊ नये म्हणून धूर देखील केला होता.”