सोयाबीनवर व्हायरस पाने पडली पिवळी
आर्विच्या परिसरातील सोयाबीन पिक हातातून जाण्याची शक्यता
शहर प्रतिनिधी आर्वी
आर्वी तालुक्यातील शेतातील हिरव्यागार सोयाबिनच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबिनच्या बहरलेल्या पिकावर अचानक नैसर्गिक रित्या व्हायरल आल्याने आता मात्र पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे सोयाबिनचे नगदी पिक हातुन जाण्याची भिती अनेक शेतकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केली आहे.
सोयाबिनच्या शेंगा पक्व व्हायला आल्या अन पिकावर चक्क व्हायरस आला आणि पाने क्षणार्धात पिवळी पडू लागली आहे. त्यामुळे तालुक्यातील सोयाबीनचे पिक आता मात्र हातुन जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला अतिवृष्टी मुळे सोयाबीन ची वाढ सुर्यप्रकाशा अभावी खुंटली होती. मध्यतंरी पिकाला पोषक वातावरण मिळाल्याने सोयाबीनची वाढ चांगली झाली. शेंगा सुद्धा जोमदार वाढल्या. मात्र नंतर शेंगा पक्व होण्याच्या काळात जोरदार पाऊस झाला आणि काही शेतातील सोयाबिनवर पिवळ्या *मोझँकचा* व्हायरस मोठ्या प्रमाणावर झपाट्याने पसरला. काही शेतामध्ये तर बुरशीजन्य कीडिचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे हिरवी झाडे सुकल्यासारखी दिसत आहेत. यामध्ये नेमका बुरशीजन्य किडिचा प्रादुर्भाव कि पिवळ्या मोझँकचा प्रादुर्भाव हे नेमके कळायला मार्ग नाही.
सोयाबीन पिक टप्याटप्याने पिवळे पडत आहे. त्यामुळे किडनियंत्रण करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात किटकनाशकांची फवारणी करीत आहेत. त्यामध्ये महागडी किटकनाशके वापरून सुद्धा किड नियंत्रण होत नाहीत, असे दिसून येत आहे. सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांना झपाट्याने किडिचा प्रकोप व प्रादुर्भाव वाढल्याने बळीराजा चिंतातुर झालेला आहेत. कुषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, अशिही मागणी शेतकऱ्यांकडुन केली जात आहेत.
मी यावर्षी माझ्या शेतात सोयाबीन हे पिक पेरले. परंतु त्यावर बुरशीजन्य किडिचा प्रादुर्भाव झाल्याने ,सोयाबीन ची पाहिजे तेवढी वाढ झाली नाही. उत्पादनात घट येण्याची शक्यता आहेत. त्यामुळे यावर्षी आमच्या सोयाबीन ला सात हजार भाव देण्यात यावा.तसेच वर्षाकाठी मिळणाऱ्या सहा हजारात अजून सहा हजाराची वाढ करण्यात येवून, एकुण बारा हजार शेतकरी मानधन करण्यात यावे.
जीवन आसोले
शेतकरी आर्वी