भडारा पोलिसांनी अपहरणकर्त्या दोन आरोपिंना 12 तासात केली अटक
अपहृत व्यक्तीची सुटका…
राजू आगलावे/भंडारा
जिल्हा प्रतिनिधी
अँकर- भंडारा पोलिस स्टेशनच्या अंर्तगत येणाऱ्या, खात रोड मार्गावर असलेल्या व्यंकटेशनगर येथील एका वक्तीचे अपहरण केल्याचे उघडकीस येताच, भंडारा पोलिसांनी तपासाची चक्र गतीने फिरवून अपहरणकर्त्या, दोन आरोपिंना 12 तासाच्या आंत अटक करून अपहृत व्यक्तीची सुटका केली. वसीम उर्फ मोसिन रहिम खान वय (21) रा. खरबी, नागपरू व मंगेश कातोराव सावरकर वय (41) रा. इतवारी नागपूर अशी आरोपिची नावे असुन प्रशांत वाहने असे अपहृत सुटका झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
👉अपहृत व्यक्ती प्रशांत वाहने हा दिनांक 13 मे रोजी रात्री उशीरापर्यंत घरी परत न आल्याने,त्याची पत्नी दीपा वाहने हिने भंडारा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. भंडारा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, तपासाची चक्रे फिरवून गोपनीय माहितीच्या व पुराव्याच्या आधारे प्रशांत चा चार-पाच जणांनी बळजबरीने अपहरण करून एका पांढऱ्या रंगाच्या वाहनामध्ये घेऊन गेल्याचे स्पष्ट होताच, पोलिसांनी आरोपी यांनी वापरलेल्या वाहनाबाबत शोध घेऊन दोन्ही आरोपिंसह वाहन ताब्यात घेतले आणि त्यांची विचारपूस केली असता आरोपींनी उधार घेतलेल्या पैशाच्या कारणावरुन प्रशांत वाहने यांचे अपहरण केल्याचे कबूल केले. ही कारवाई भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस उपनिरीक्षक मंगेश कराडे, पो.हवा. प्रशांत भोंगाडे, साजन वाघमारे, बालाराम वरखडे, सुनील राठोड, नरेंद्र झलके आदींनी केली.