क्राइम

प्रेमात धोका देऊन दुसऱ्या तरुणाशी लग्न केल्याने संतापलेल्या तरुणाकडून तरुणीचा खून 

Spread the love

डोक्यात कोयत्याने सपासप वार करत केला खून 

विश्रांतवाडी / नवप्रहार डेस्क

                    स्कुल लाईफक्त मध्ये लग्नाच्या आणभाका घेऊन देखील तरुणाने दुसऱ्याच मुलाशी लग्न केल्याने संतापलेल्या तरुणाने (एक्स प्रियकर ) तरुणीच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार करून तिचा खून केला. पळून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. घटना कळस येथे मंगळवारी रात्री घडली. गौरी लणेश आरे (वय २५, सध्या रा. लक्ष्मीकुंज सोसायटी, कळस) असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी पती लणेश आरे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अमोल कांबळे (वय.२५, रा. श्रमिकनगर, विश्रांतवाडी) याला अटक केली आहे. त्यास सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

विश्रांतवाडी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गौरी व आरोपी अमोल यांचे टिंगरेनगरमधील शाळेत असताना प्रेमसंबंध होते. दोघेही लग्न करणार होते. मात्र गौरी ही मूळ गावी रत्नागिरी येथे गेल्यानंतर तिने दुसऱ्याच मुलाशी लग्न केले, याचा राग आरोपी अमोल यास होता.

गौरी भावाकडे कळस येथे आल्याची माहिती आरोपी अमोल याने गौरीच्या स्टेटसवर बघितली. त्यानंतर धारदार कोयता घेउन अमोल तिच्या मागावर होता. गणपती विसर्जनाच्या दिवशी गौरी जात असताना रिक्षात दबा धरून बसलेल्या अमोलने तिच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी महिलेला पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले.

पण बुधवारी सकाळी उपचारादरम्यान गौरीचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर आरोपी अमोल हा पळून जात असताना विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलिस कर्मचारी संपत भोसले यांनी शिताफीने ताब्यात घेतले. या प्रकरणी अधिक तपास विश्रांतवाडी पोलिस करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close