सुपारी होती भलत्याच कामाची आणि केले भलतेच
पुणे / क्राईम रिपोर्टर
सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सतीश वाघ यांची हत्या त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिने सुपारी देऊन केली हे तपासात उघड झाले आहे. सुरवातीला हा खून अनैतिक संबंधातून झाला असे समोर आले होते. पण आता सतीश वाघ हे पत्नी मोहिणीला खर्चासाठी पैशे Dयेत नसल्याने मोहिनी यांनी सतीश यांचे हातपाय तोडण्याची सुपारी दिली होती. पण मारेकऱ्यांना जेव्हा समजले की ते आमदारांचे मामा आहेत तेव्हा त्यांनी त्यांची हत्या केली.
सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिने सुपारी फक्त हातपाय तोडण्याची दिली होती. परंतु हल्लेखोरांना जेव्हा समजले सतीश वाघ हे आ. योगेश टिळेकर यांचे मामा आहे, तेव्हा त्यांनी हत्या केली.
सतीश वाघ हत्याकांडत नवा खुलासा
सतीश वाघ हत्या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. पोलिसांच्या चौकशीतून सतिश वाघ खून प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आणखी एक चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे.
ठरले असे अन् केले असे
सुरुवातीला सतीश वाघ यांचे फक्त हात पाय तोडण्याची सुपारी देण्यात आली होती. मात्र मारेकऱ्यांना जेव्हा सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत असे समजले. त्यानंतर त्यांनी त्यांचा खून केला. सतीश वाघ हे पत्नीला मारहाण करत होते. तसेच घर खर्चासाठी पैसेही देत नव्हते. यावरून मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
सुरवातीला सुपारी फक्त सतीश वाघ यांचे हातपाय तोडून त्यांना अपंग करण्याची होती. हात पाय तुटल्यानंतर ते घरात बसतील, त्यानंतर घरातील सर्व आर्थिक व्यवहार आपल्या ताब्यात येतील, असे मोहिनी वाघ यांना वाटले. नवरा अपंग झाला म्हणजे आपल्याला त्याला सांभाळता येईल असा विचार म्हणून मोहिनी वाघ हिने हा प्रकार केल्याचे चौकशीत समोर आले आहे.