प्रियकराचे भयानक कृत्य…. तू माझी नाही झाली तर दुसऱ्याची होऊ देणार नाही !

‘ बड डे ‘ च्या दिवसीच प्रियकराने केली प्रेयसीची हत्या
मुंबई / विशेष प्रतिनिधी
प्रेम हे भावनिक आकर्षण असले तरी सध्या प्रेमात भावनिक आकर्षणा पेक्षा शारीरिक आकर्षण पाहायला मिळत आहे. अनेक प्रकरणात मुलींकडून मिळालेला नकार किंवा प्रेम सुरू झाल्यानंतर केलेला घाट यातून जीवे मारण्याच्या अनेक घटना घडतात. प्रत्येक वेळेस प्रियकरचाच दोष असतो असे नाही . काही वेळा मुली टाईमपास म्हणून देखील मुलांशी जवळीक साधतात.आणि त्यानंतर अन्य कुणाशी लग्न करतात. तीन वर्षे प्रेम संबंधात राहिल्यावर एका प्रेयसीचे लग्न जुळल्याने आणि त्या लग्नास तिने नकार न दिल्याने संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या ‘ बड डे’ लाच तिची हत्या केल्याची घटना झारखंड राज्यात घडली आहे.
मांडर ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मिन्नी कुमारी चे अविनाश नामक युवकाशी प्रेमसंबंध होते. मागील 3 वर्षांपासून ते एकमेकांच्या प्रेमात होते. दरम्यान मिन्नी च्या घरच्यांनी तिचे लग्न अन्य तरुणा सोबत जुळले.मिन्नी ने या लग्नाला विरोध का केला नाही म्हणून अविनाश संतापला होता. त्याने मिन्नी च्या वाढदिवसाच्या दिवशी तिला जंगलात बोलावले.आणि तिच्या हत्या केली. मुख्य म्हणजे मिन्नी तिच्या होणाऱ्या नवऱ्या सोबत वाढदिवस साजरा करून परतत होती. अविनाश ने तिच्या सोबत वाढदिवस साजरा करण्याची ईच्छा दर्शवली.
पुरावे मिटविण्यासाठी अविनाश ने तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना जंगलात मृतदेह जळत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस जंगलात पोहचले. तेव्हा त्यांना अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. पोलिसांनी आग विझवून चौकशीला सुरवात केली. व शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला. घटनास्थळी पोलिसांना अनेक पुरावे सापडले, त्यात एक जॅकेटही होतं. टेक्निकल टीमची या घटनेचा तपास करताना पोलिसांना खूप मदत मिळाली. त्यामुळेच पोलिसांनी आरोपी अवनीश कुमार याला पकडलं. त्याची चौकशी केली असता, सगळं प्रकरण उघड झालं.
चौकशीदरम्यान त्याने सांगितलं की त्या तरुणीशी त्याचे गेल्या 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते; पण मिन्नी हिचं लग्न दुसऱ्याशी ठरलं आणि तिने त्या लग्नाला विरोध केला नाही. त्यामुळे त्यानं तिची हत्या करण्याचा कट रचला. लग्न ठरलेल्या जोडीदाराशी वाढदिवस साजरा करून ती परतत होती, तेव्हा तिला फोन करून तिचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा त्यानं व्यक्त केली. त्यानंतर तो तिला घेऊन मांडर भागातल्या जंगलात गेला. दोघांनी जंगलात केक कापला आणि वाढदिवस साजरा केला. दोघांनी एकमेकांना केक भरवला. त्यानंतर अवनीशनं रबराच्या पाइपच्या साह्याने मिन्नीचा गळा आवळून तिला मारायचा प्रयत्न केला. मिन्नीने विरोधही केला, तेव्हा त्यानं तिला बुक्क्यानं मारलं. त्यामुळे तिच्या तोंडातून रक्त आलं. अखेर अवनीशने पाइपच्या साह्याने तिची हत्या केली.
मिन्नीच्या तोंडातून आलेलं रक्त अवनीशच्या जॅकेटलाही लागलं होतं. पोलिसांनी ते जॅकेट ताब्यात घेतलं आहे. त्या ठिकाणी पोलिसांना रबरी पाइपही मिळाला आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता, पोलीस या घटनेत स्पीड ट्रायलच्या माध्यमातून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा करण्याचा प्रयत्न करतील, असं रांची ग्रामीणचे एसपी मनीष टोप्पो यांनी सांगितलं आहे.