तहसीलदार यांना जावरा गावातील बेरोजगार महिलांनी दिले निवेदन.
अल्पभूधारक व भूमिहीन महिला मजुरांना दहा दिवस पाहिजे काम.
चांदुर रेल्वे (ता. प्र.) प्रकाश रंगारी
चांदुर रेल्वे : दि.12 जावरा येथील महिला बेरोजगार मजुरांनी रोजगार हमी योजनेतून दहा दिवस काम मिळण्याकरिता आज तहसीलदार चांदुर रेल्वे यांना निवेदन दिले.
शेतातील काम नसल्यामुळे अल्पभूधारक व भूमिहीन बेरोजगार महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता दहा दिवस रोजगार हमी योजनेतून काम मिळण्यात यावे. याकरिता चांदुर रेल्वे तहसीलदार यांना आज निवेदन दिले. जावरा येथील बेरोजगार महिला यांनी ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांचेकडे वारंवार कामाची मागणी करूनही आतापर्यंत काम मिळाले नाही तहसीलदार चांदुर रेल्वे यांना निवेदन देण्यात आले. आमचा जगण्याचा विचार करून आम्हाला त्वरित काम देण्यात यावे अशी विनंती बेरोजगार महिलांनी तहसीलदार साहेबांना या निवेदनातून केली आहे. यावेळी धर्मदास वरघट, प्रेमचंद अंबादे, मेघना टेंभुर्णी, चंद्रकला सुलताने, सुनंदा टेंभुर्णे, ऋतिका अंबादे, अनिता जांभुळकर, रेखा अंबादे, जयश्री भैसारे, इंदिरा घाटोळ, करुणा राऊत, अनिता अंबादे, माला नंदेश्वर, उज्वला वानखडे, मंजू बोदिले, ज्योती नंदेश्वर, शीला वानखडे, साधना वानखडे, प्रीती वानखडे, उषा वानखडे, निर्मला मोहोळ, वनमाला वरघट, पुना माटे, भारती हाडे, अस्मिता भैसारे,उज्वला उंदीरवाडे, सविता साखरे, नीता सहारे, पूजा बोधिले यांची उपस्थिती होती.