सामाजिक

तलाठी पदावर निवड झाल्याने शाल श्रीफळ, प्रतिमा देऊन सत्कार

Spread the love

: पस सदस्य मंगेश राऊत यांचा पुढाकार
:-मोहरणा, नांदेड येथील युवकाचा सत्कार

लाखांदूर ,/ प्रतिनिधी

अत्यंत गरीब कुटुंबातील फारसे सुशिक्षित नसतांना आई वडील यांनी केलेल्या मेहनतीने व चिकाटीने मुलांना शिकऊन मोठे करण्याचा मान आज दोन्हीं मूलानी मोठा केलेला आहे.
या सत्काराला सत्कारमूर्ती मोहरणा येथील रहिवाशी स्वप्नील मदन भानारकर व नांदेड येथील जयघोष प्रल्हाद मोहरकर यांची तलाठी भरती प्रक्रियेत निवड करण्यात आली. उत्कृषटरित्या गुण संपादन केले असता आज दिनांक २६जानेवारी रोजी पंचायत समितीचे सदस्य मंगेश राऊत यांच्या प्रमूख उपस्थितीत शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. स्वप्नील मदन भानारकर याची गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवड झाली.टेंबरी तेथील मामाच्या गावात शिक्षण झाले.प्रतिकूल परिस्थीत असताना वडिल मदन यानी गावात गावठी चिवडा व पिंगर विकन्याचा वडिलोपार्जित व्यवसाय असून स्वप्नील हा आपल्या मामाकडे दिवाकर दीघोरे यांचेकडे राहुन आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, आज त्यांची तलाठीपदी निवड झाली.तर नांदेड येथील जयघोष प्रल्हाद मोहरकर यांची भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात निवड झाली.जयघोष हा शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी असून आदी पोलीस पाटील पदावर आताच निवड झाली होती.परतू मनात जिद्द व चिकाटी मेहनतीने त्याला पुढील वाटचाल करन्यासाठी लाखांदूर येथील वाचनालयात अभ्यास केला असल्याचे त्या दोघांनी सांगितले,यावेळी उपस्थित मोहरणा गावचे सरपंच निलेश बोरकर, उपसरपंच नरेश राऊत, नांदेड गावचे सरपंच अरुण बावनकर, गट सचिव स्वप्नील ठेंगरी, प्रभाकर चौधरी, ग्रामसेवक एस एस टिकले,बबलू राउत, मिलींद रामटेके,अर्चना रामटेके, अर्चना मेश्राम, अर्चना राऊत, मोरेश्वर राऊत, संजय राऊत, गुरुदेव साठवणे,श्रीराम भानारकर, जयपाल कुत्तरमारे, प्रशिक ठेंगरि, यादो पिलारे, महेंद्र बोरकर, अमर माटे, प्रल्हाद मोहरकर, मारोती वलथरे, नरेश मोहरकर, मेश्राम सर, अशोक मेंढे आधी जण उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close