मारहाणीत ग्राहकाचा मृत्यू ; शॅक मालक ,मुलगा आणि दोन कर्मचाऱ्यांना अटक

कळंगुट / विशेष प्रतिनिधी
मित्रांसोबत जेवायला गेलेल्या तरूणांत आणि शॅक चालकात जेवणावरून झालेल्या वादाचे रुळांतर मारहाणीत झाल्याने आणि त्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी शॅक मालक ,त्याचा मुलगा आणि तेथे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना खुनाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कळंगुट समुद्रकिनाऱ्यावरील मरीना शॅकमध्ये भोला रवि तेजा रा आंध्रप्रदेश हा आपल्या मित्रांसमवेत जेवायला गेला होता. रवी तेजा आणि त्याच्या मित्रांना आणखी खाद्यपदार्थ पाहिजे होते. पण मरीना शॅक वरील नोकरांनी खाद्यपदार्थ संपल्याचे सांगितले. त्यावरून रवी तेजा त्याचे मित्र आणि शॅक मालक ,त्याचा मुलगा आणि दोन कर्मचाऱ्यांत मारहाण झाली. त्यात तेजाचा मृत्यू झाला.
शॅक मालक आग्नेल सिल्वेरा (वय ६४) याच्यासह पोलिसांनी शॅक मालकाचा मुलगा शुबर्ट सिल्वेरा (वय २३), अनिल बिस्ता (२४, मूळ नेपाळ) आणि कमल सुनार (२३, मूळ नेपाळ) यांना अटक करण्यात आली आहे.
भोला रवि तेजा त्याचे मित्र आणि शॅकच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर मारामारीत झाले. शॅक कर्मचाऱ्यांनी तेजा व त्याच्या मित्रांना मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या तेजाचा कांदोळी येथील रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. या घटनेनंतर शॅक मालक फरार झाला होता.
कळंगुट पोलिसांनी तात्काळ तपास सुरु करुन शॅक मालक आग्नेल आणि त्याचा मुलगा व दोन कर्मचाऱ्यांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, भोला रवि तेजा व त्याचे मित्र मरीना शॅकमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. दरम्यान, त्यांना आणखी खाद्यपदार्थ हवे असताना शॅक बंद झाल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. यावरून दोन्ही गटात वाद झाला. व प्रकरण मारहाणीपर्यंत आले.
शॅक कर्मचाऱ्यांनी केलेल्या जबर मारहाणीत भोला रवि तेजा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कांदोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तेजाचा मृत्यू झाल्याची घोषणा डॉक्टरांनी केली. पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे.