डॉ. अत्रे यांच्या घरासमोरिल रस्त्याची दैनिय अवस्था

घाटंजी ता प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
सध्या ईलेक्शन वारे घोंघावत असल्याने ब-याच कामाला मंद गती आलेली दीसत आहे. निवडणूकीच्या कामात आहो, आचार सहीता सूरु आहे.हे बहाने जनतेला मात्र विना कारण त्रास सह करायला लावत आहे. आधीच शासनाच काम बारा महीने थांब.त्यात आता आचार सहीता भुत मानगुटीवर बसल्याच कारण देत घाटंजी नेहरु नगर येथिल चौरीवार ते डोनाडकर यांच्या घरासमोरील मुख्य रस्ता खोद काम करुन गिट्टी टाकलेल्या अवस्थेत गेल्या एक ते दीड महीण्यापासून मरणावस्थेत आहे. या खडतर रस्त्यावर रहीवासी नागरिकांना चालतांना तारेवरची कसरत करत जिव मुठीत घेऊन चालावे लागत असून त्यामूळे गिट्टी ठीगारे वरून टू व्हीलर गाडी घरी कशि न्यायची ह्या गहण विचारात लोक आहेत. एकत रस्ता त्वरित करा अन्यथा रस्त्या वरिल गिट्टी ठीगारे उचलून मुरुन टाकून रस्ता खुला करा व रहीवासी जनतेला त्रास मुक्त करा.ही मागणी आता लोकातून संमधीत बांधकाम विभाग, सताधारी, ठेकेदार कडे केली जात आहे. असिच काहीसी परिस्थिती पोष्ट ऑफीस मागिल टेलर लाईन रस्त्याची आहे हेही उलेखनिय.