साखरा शिवारात वाघाने केली गोठ्यातील म्हशिची शिकार
घाटंजी ता. प्रतिनिधी- सचिन कर्णेवार
घाटंजी तालुक्यातील साखरा शिवारात वाघाची दहशत असून गावाला लागूनच असलेल्या आकाश सिसले या शेतकऱ्यांच्या शेतात बांधलेल्या गोठ्यात एका मशीला दिनांक 26 फेब्रुवारी रोज सोमवारला रात्री ठार करून शिकार केली. सविस्तर वृत्त असे कि आकाश सिसले यांच्या शेतात गोठा बांधलेला असून शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसायासाठी मशी पोसलेल्या होत्या अनेक वर्षांपासून त्या गोठ्यातच ते आपली सर्व जनावरे बांधत होते परंतु 27 फेब्रुवारी रोज मंगळवारला सकाळी शेतकरी शेतात गोठ्याची साफसफाई करण्याकरिता गेला असता तिथे एका मशीची वाघाने चिरून ठार केल्याचे त्याच्या निदर्शनास आले तेव्हा त्यांनी सदर घटनेची माहिती वनविभागाला दिली असता वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोका पाहणी करून साक्ष समेत पंचनामा केला. वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी खात्री करण्याकरिता शेतकऱ्यांच्या शेतातील गोठ्यात सी सी टी वी कॅमेरा 26 फेब्रुवारी ला सायंकाळी बसवून दुसऱ्या दिवशी सी सी टी वी फुटेज वरून तपासून त्या मशीची शिकार वाघानेच केल्याची खात्री केली. शिकार झालेल्या मशीची खुल्या बाजार भावाप्रमाणे अंदाजे 60000/- रुपयांचा नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त न केल्याने आज शेतकऱ्यांना नुकसानीला तोंड द्यावे लागले त्यामुळे शेतकरी आज मोठया अडचणीत सापडला आहे वरील झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे मागणी केली आहे.सदर घटनेमुळे परिसरातील मजूर आणि शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सदर घटनेविषयी विचारणा केली असता सी सी टी वी कॅमेरात वाघ दुसऱ्या दिवशी रात्री शिकार केलेल्या मशीला खाण्याकरिता गोठ्यात आल्याचे सी सी टी वी फुटेज मध्ये आढळून आल्याचे सांगण्यात आले त्यामुळे परिसरातील नागरिकाच्या जीवाला होणार धोका टाळण्यासाठी आणि नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ते युक्तवाद करून वन्यप्राण्यांचे बंदोबस्त करण्याचा आमच्या विभागाकडून प्रयत्न चालू आहे.