_डॉ.सतीश चिद्दरवार यांचा खास सन्मान; आर्य वैश्य समाज डॉक्टर असोसिएशनच्या वतीने ‘सुश्रृत जीवन गौरव’पुरस्कार प्रदान!_
पुसद /राजेश सोनुने
वैद्यकीय व ले-आउट बांधकाम विश्वात तसेच सामाजिक आणि विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणारे डॉ. सतीश वसंतराव चीद्दरवार यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केल्याने त्यांचा आर्य वैश्य समाज डॉक्टर असोसिएशन बांधवांच्या वतीने त्यांच्या एकसष्ठी निमित्त ‘सुश्रृत जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करुन सन्मान करण्यात आला.
याबाबत प्राप्त माहिती अशी की पुसद शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील व ले-आउट बांधकाम क्षेत्रातील सुप्रचित डॉ. सतीश वसंतराव चीद्दरवार यांच्या एकसष्ठी निमित्त आर्य वैश्य समाज डॉक्टर असोसिएशन बांधवांच्या वतीने दि.२३जुलै २०२३ रोजी पुसद शहरातील माहूर रोड वरील हॉटेल अतिथी येथील सभागृहात एक छोटाखाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आर्य वैश्य समाज डॉक्टर असोसिएशन बांधवांच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात तसेच ले-आउट बांधकाम क्षेत्रात व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले शहरात मागील ३५ वर्षापासून निरंकार सेवा देणारे सामाजिक कार्यात व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेले सुप्रचित डॉ. सतीश वसंतराव चीद्दवार यांच्या एकसष्ठी दिनाचे औचित्य साधून छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून त्यांना या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी
डॉ. देवानंद ओमनवार (एमडी) रा. परभणी यांच्या हस्ते ‘सुश्रृत जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी डॉ. उमेश रेवणवार यांनी डॉ. सतीश वसंतराव चीद्दरवार यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या त्यामध्ये ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल, मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, लेआउट व बांधकाम क्षेत्रात केलेले विकासकामे तसेच पंतप्रधान निवास योजनेतून (PMAY) नागपूर येथे ३७१ मध्यमवर्गीय नागरिकाचे घराचे स्वप्न करणारा प्रोजेक्ट व सर्वसामान्यांचे घराचे स्वप्नपूर्ती अशा समाज उपयोगी कामाचा संपूर्ण जीवनपट उलगडून गुणगौरव केला.
तर यावेळी डॉ.सुधीर झिलपिलवार यांनी आर्य वैश्य समाजाच्या मंगल कार्याकरिता ले-आउट ची तीन एकर जमीन आदलाबदली करून सामाजिक भावनेतून समाजाच्या ट्रस्टला दिल्याबद्दल डॉ.सतीश चीद्दरवार तयांचे आभार मानले. याप्रसंगी त्यांचा मुलगा डॉ.सजल सतीश चिद्दरवार( डिएम) कार्डिओलॉजी ह्र्दयरोग तज्ञ झाल्याबद्दल व डॉ. पूनम चीद्दरवार हिचा रेडिओलॉजिस्ट एमडी (क्ष-कीरण तज्ञ) झाल्याबद्दल आर्य वैश्य समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्ती डॉ. सतीश वसंतराव चीद्दरवार यांनी सत्काराला उत्तर देताना सर्व समाज बांधवांचे आभार मानून कृतज्ञ व्यक्त केले व सामाजिक कार्य भविष्यात असे चालू ठेवण्याबाबत ग्वाही दिली. तर यावेळी डॉ.सुप्रिया सतीश चिद्दरवार यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष रेवणवार व डॉ. प्रणिता रेवणवार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. आनंद कोमावार यांनी मानले.
या कार्यक्रमाला डॉ. सुधीर झिलपिलवार डॉ.उमेश रेवणवार डॉ. आनंद कोमावार डॉ. मिलिंद तगडपल्लेवार डॉ. पदमवार डॉ. मंजुषा तगडपल्लेवार डॉ.बिडवाई डॉ.प्रणिता रेवणवार व आदी आर्य वैश्य समाजातील अनेक नामवंत डॉक्टर व समाज बांधव उपस्थित होते.