विदेश

बार बाहेर काढल्याचा त्याला आला राग त्याने  बारला लावली आग 

Spread the love

आगीत बार जळून खाक, 11 लोकांचा होरपळुन मृत्यू , चार लोक  अस्तव्यस्त 

मेक्सिको / नवप्रहार वृत्तसेवा

                  नशेत असलेल्या युवक महिलांशी गैरवर्तन करीत असल्याने त्याला बार मधून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे तो इतका संतापला की त्याने बार च्या दारावर केमिकल टाकुन त्याला आग लावली. पाहता पाहता आगीने उग्र रूप धारण केले  आणि  संपूर्ण इमारतीला आपल्या बाहुपाशात घेतले. यात 11 लोकांचा होरपळुन मृत्यू झाला आहे. तर चार लोकांची  परिस्थिती गंभीर आहे. मेक्सिकोच्या उत्तर भागात असणाऱ्या सॅन लुईस रियो कोलोराडो या शहरात ही दुर्दैवी घटना घडली.

शनिवारी (स्थानिक वेळेनुसार) ही घटना घडली. एका व्यक्तीने गैरवर्तन केल्याबद्दल त्याला बारमधून बाहेर हाकलण्यात आलं होतं. याचा राग मनात ठेऊन त्याने थेट बारच्या इमारतीलाच आग लावली. यामुळे ही दुर्घटना घडली.

या व्यक्तीने बारच्या दरवाज्यावर हे केमिकल फेकले, आणि त्याला आग लावली. यानंतर ही आग वेगाने पसरून संपूर्ण बार खाक झाला. मृतांमध्ये चार महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. यासोबतच, आणखी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.सोनोरा स्टेटच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. या घटनेवेळी आरोपी भरपूर नशेत होता. तसंच, त्याला बारमधील महिलांशी गैरवर्तन केल्याबद्दल बाहेर काढण्यात आलं होतं, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. बारला आग लावण्यासाठी या व्यक्तीने मोलोटोव्ह कॉकटेलचा वापर केल्याचंही सांगण्यात येत आहे.

या दुर्घटनेत बळी गेलेली एक महिला अमेरिकेची नागरिक होती. तर, एका १७ वर्षांच्या मुलीचाही यात बळी गेल्याचं समोर आलं आहे. स्टेट अटॉर्नी जनरल गुस्ताव्हो रोम्युलो सालस यांनी याबाबत माहिती दिली. तसंच, या आरोपीला अटक करण्यात आल्याचं शहराच्या महापौरांनी स्पष्ट केलं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close