अपघात

मुलाला पाण्यात वाहताना पाहून आई गेली वाचवायला पत्नी च्या मागे पती देखील गेला अन घात झाला 

Spread the love

पुणे / नवप्रहार मीडिया

                मुलाला कालव्याच्या पाण्यात बुडतांना पाहून आईने मुलाला वाचवण्यासाठी कालव्यात उडी टाकली. पण पाण्याचा जोर वाढल्याने आणि पोहता येत नसल्याने ती बुडू लागली . तिला बुडतांना पाहून नवऱ्याने पाण्यात उडी टाकली.आणि मुलाला काढले पत्नीला वाचवण्यासाठी पुन्हा पाण्यात उडी घेतली. दरम्यान पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोघे पतिपत्नी पाण्यात वाहून गेले. मुलगा मात्र बचावला आहे. यामुळे चार मुलं पोरकी झाली आहेत. परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सोनी कश्यप असे मृत महिलेचे नाव आहे. तर अशोक कश्यप पतीचे  आणि रणजित असे मुलाचे नाव आहे. कश्यप दाम्पत्य कुंजीरवाडीत कामाला होते. शनिवारी दुपारी आपल्या चार मुलांना घेऊन ते फिरायला निघाले. दुपारी ते मुठा उजवा कालव्याजवळ आले होते. येथे आल्यावर सर्व मुले खेळू लागली. काही वेळातच रणजित पोहण्यासाठी कालव्यात गेला. कालव्यातील पाणी अचानक वाढू लागले.

आपला मुलगा पाण्यात वाहून जात असल्याचे आईच्या लक्षात आले. कसलाही विचार न करता आईने तातडीने कालव्यात उडी घेतली. आपल्या मुलाचा जीव वाचवण्याचा तिने फार प्रयत्न केला. मात्र या महिलेला पोहता येत नव्हते.

मुलगा आणि पत्नीला पाहून अशोकनेही पाण्यात उडी घेतली. त्याने आधी मुलाचा जीव वाचवला. मुलाला पाण्यातून बाहेर काढले. नंतर पत्नीचा जीव वाचवण्यासाठी तो पुन्हा पाण्यात गेला.

मात्र तोवर कालव्यातल्या पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला होता. यात पती पत्नी दोघेही वाहून गेले. हा धक्कादायक प्रसंग चारही मुलांनी स्वताःच्या डोळ्यांनी पाहिला. सदर घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांना आईचा मृतदेह सापडला आहे. वडिलांच्या मृतदेहाचा अद्यापही शोध सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close