लैंगिक संतुष्टी साठी केले असे की व्हावे लागले रुग्णालयात भरती
ऑस्ट्रेलिया / नवप्रहार वृत्तसेवा
काही लोक लैंगिक संतुष्टी साठी भलतेच काही करून बसतात. आणि जेव्हा त्यांना त्या प्रययोगापासून होणाऱ्या वेदना असह्य होतात मग मात्र त्यांना वैद्यकीय मदत घ्यावी लागते. एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीने लैंगिक आत्मसंतृष्टीसाठी केलेला भलताच उद्योग त्याच्या चांगलाच अंगाशी आला. वय वर्षे 73 असलेल्या सदर व्यक्तीने लैंगिक आत्मसंतृष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्या लिंगात चक्क बॅटरी घातली.
तीन बटनांची ही बॅटरी लिंगात आत खोलवर गेली आणि तिथेच अडकून राहिली. ती बाहेर काढण्यात त्याला अपयश आले. परिणामी त्याला वैद्यकीय मदत तातडीने घ्यावी लागली. डॉक्टरांनी ही बॅटरी शस्त्रक्रिया करुन बाहेर काढली. ज्यामुळे या व्यक्तीला जीवदान मिळाले. मात्र, त्याच्या या अघोरीपणाची चर्चा जगभरात होऊ लागली आहे.
लैंगिक आत्मसंतृष्टीसाठी कृती
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीने सांगितले की, लैंगिक आत्मसंतृष्टीसाठी सदर व्यक्ती नेहमीच अशा प्रकारची कृती करतो. तो आपल्या लिंगामध्ये बॅटरी घालतो आणि यशस्वीरित्या बाहेर काढतो. या वेळी मात्र त्याची ही कृती कुठेतरी चुकली आणि बॅटरी आतच अडकली. धक्कादायक म्हणजे बॅटरी लिंगामध्ये खोलवर रुतली होती. ज्यामुळे त्याला मूत्रमार्गास अडथळा निर्णाण झाला. इतकेच नव्हे तर त्याला इतरही शारीरिक त्रास सुरु झाला. सायन्स डायरेक्टने याबाबत वृत्त दिले आहे.
शारीरिक त्रासामुळे वैद्यकीय मदत
शारीरिक त्रास सुरु झाल्यानंतर पीडित व्यक्तीने वैद्यकीय मदत मागितली. डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करुन घेले. त्याच्यावर उपचार सुरु केले. दरम्यान, त्याची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली. या वेळी आलेल्या वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे की, बटण बॅटरी घालण्यामुळे मूत्रमार्गाच्या नेक्रोसिसची पहिली नोंद झाली आहे. ज्यामुळे पीडिताला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले. लिंगामध्ये वेदना, गंभीर पॅराफिमोसिस आणि मूत्रमार्गात अडथळा आणणारी लक्षणे जाणवत होती.
शस्त्रक्रिया करुन काढली बॅटरी
डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लिंगातील बॅटरी काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी तातडीने हालचाली सुरु केल्या. डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीची अशी शस्त्रक्रिया पूर्ण करुन लिंगातील बॅटरी यशस्वीरित्या बाहेर काढली. डॉक्टरांना आढळून आले की, गृहस्थाने लिंगामध्ये छोट्या बटनाच्या आकाराचे छोटे तीन सेल (बॅटरी) लिंगात घातले होते. जे डांबरासारख्या काळ्या रंगाचे होते. ज्यामुळे त्याला गँग्रीन अथवा मूत्रमार्गाचा विकार होण्याचा संभव होता.
प्राप्त माहितीनुसार, दहा दिवस हॉस्पीटलमध्ये उपचार घेतल्यानंततर सदर व्यक्तीस डिस्चार्ज मिळाला आहे. असे असले तरी अद्यापही त्याच्या लिंगाला सूज आणि शस्त्रक्रिया केल्याच्या खुणा कायम आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला विश्रांती आणि पुन्हा असले उद्योग न करण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या गुप्तांगामध्ये चुकीच्या पद्धतीने कोणत्याही प्रकारे बाहेरील वस्तूचा प्रवेश करु नये. असे केल्याने अनावश्यक व्याधी पाठी लागतात. ज्यामुळे तुमच्या जीववरही बेतू शकते असे डॉक्टर म्हणाले.