कुत्रा दाखवण्याचा बहाण्याने घरी बोलावत केला अत्याचार

अल्पवयीन मुलीवर ही सगळ कॉमन आहे असे म्हणत केला अत्याचार
मुलीच्या पोटात दुखू लागल्यावर आला प्रकार समोर
पुणे / विशेष प्रतिनिधी
सोशल मीडियावरून झालेल्या मैत्रीचा तरुणाने गैर फायदा घेत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी बोलावून हे सगळ कॉमन आहे.आणि मी तुझ्याशी लग्न करणार अस म्हणत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. मुलीच्या पोटात दुखू लागल्यावर आई वडिलांनी तिला डॉक्टर कडे घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी सोनोग्राफी केल्यावर ती १० आठवड्याची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे एकूण मुलीच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी लगेच सहकार नगर ठाण्यात या बद्दल तक्रार नोंदवली आहे.
सहकारनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रथमेश ज्ञानेश्वर राऊत (वय २३, रा. धनकवडी, पुणे) असे आहे. या प्रकरणातील पीडित मुलगी अवघ्या १६ वर्षांची आहे. आरोपी प्रथमेशने ‘इन्स्टाग्राम’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या मुलीशी ओळख वाढवली होती. संवादातून मैत्री वाढल्यानंतर, नोव्हेंबर २०२५ मध्ये त्याने “माझ्या घरी नवीन कुत्रा आणला आहे, तो बघायला ये,” असे सांगून तिला आपल्या घरी बोलावले.
मुलगी घरी आल्यानंतर, तिने विरोध करूनही आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. “मी तुझ्याशी लग्न करणार आहे, हे सगळं आजकाल कॉमन आहे,” असे सांगून त्याने तिची दिशाभूल केली आणि वारंवार तिचे लैंगिक शोषण केले. हा प्रकार नोव्हेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६ या दरम्यान सातत्याने सुरू होता.
काही दिवसांपूर्वी पीडित मुलीला सतत उलट्या आणि मळमळीचा त्रास होऊ लागला. घरच्यांनी तिला डॉक्टरांकडे नेले असता, तिची सोनोग्राफी करण्यात आली. तेव्हा ती १० आठवड्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकून पालकांना मोठा धक्का बसला. पीडितेने घडलेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सहकारनगर पोलिसांनी आरोपी प्रथमेश राऊत विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.




