हटके

ऑनलाईन गेम द्वारे धर्मांतरणाचा प्रकार उघड  ; महिलेचे केले ब्रेनवॉश

Spread the love

लखनौ / नवप्रहार न्यूज नेटवर्क 

               ऑनलाईन गेम द्वारे उत्तरप्रदेश च्या गाझियाबाद मध्ये  घडलेला धर्मांतरणाचा किस्सा ताजा असतांनाच आता राजस्थान च्या सिकर मध्ये  धर्मपरिवर्तनाचा प्रकार उघड झाला आहे. नवरा परदेशात नोकरीवर असल्याने टाईमपास म्हणून ऑनलाईन गेम खेळणारी महिला मुस्लिम युवकाच्या संपर्कात आल्यानंतर त्याने तिचा असा ब्रेनवॉश केला की तिने कपाळाला बिंदी आणि सिंदूर लावणे सोडून दिले. तिने बुरखा देखील खरेदी केला होता. ही बाब तिच्या भावाच्या लक्षात आल्यावर  या प्रकरणाचा भांडाफोड झाला. ती नमाज अदा करू लागली. तसेच तिचे हर्षिता हे नाव बदलून हानिया ठेवण्यात आले.

हे प्रकरण राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे. धर्मांतर झालेल्या पीडितेचा पती हा परदेशात राहतो. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी पीडित महिला ऑनलाइन गेम खेळायची. फ्री फायर गेम खेळत असताना पीडितेने लव्ह लाईफ नावाच्या ग्रुपमध्ये जॉईंड झाली. या गटात तिची ओळख अलीगढ येथील तैयब खान याच्याशी झाली. सुरुवातीच्या संभाषणानंतर दोघांनी इंस्टाग्रामवर तासनतास चॅटिंग सुरू केलेदरम्यान, तैयबने हर्षिताला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगण्यास सुरुवात केली. त्याने हर्षिताला नमाज अदा करायला शिकवले. इस्लामबद्दल बोलून हर्षिताचे ब्रेनवॉश तैयब करत असतं. त्याच्या बोलण्याने प्रभावित होऊन हर्षिताने बुरख्यासारखे दिसणारे गाऊन विकत घेतले.

हर्षिताच्या घरच्यांना तिच्या या वागण्याबद्दल माहिती नव्हती. एके दिवशी त्याच्या भावाला कपड्यांमध्ये बुरखा दिसला तेव्हा त्याला संशय आला. तेव्हा हर्षितानेही बिंदी आणि सिंदूर लावणं बंद केल्यांच कुंटूबियांच्या लक्षात आलं. ती आपल्या मुलांबद्दल ही बेफिकीर बनली होती. यानंतर भावाने हर्षिताचा मोबाईल तपासला असता त्यात इस्लामशी संबंधित गोष्टी आढळून आल्या. घरच्यांच्या समजूतीवर हर्षिताने सगळ्यांना ओरडायला सुरुवात केली. आणि इस्लाम स्विकारणार असल्याचे सांगितले.

पीडित हर्षिताचे म्हणणे आहे की, इस्लाम न स्वीकारल्यास तैयब खान तिला आत्महत्या करण्याची धमकी देत ​​होता. त्याने तिचे ब्रेनवॉश केले आणि तिच्या आधारकार्डचा फोटोही काढला. जेव्हा हर्षिताने तैयबला आधार कार्ड मागितले तेव्हा त्याने ते देण्यास नकार दिला. हर्षिताच्या भावाने तैयब खान आणि त्याचा साथीदार साबीर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपींचे मोबाईल क्रमांक ट्रेस करून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

याआधी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका जैन कुटुंबातील १७ वर्षीय मुलाचे ऑनलाइन गेमिंग अॅपद्वारे ब्रेनवॉश केल्याची घटना समोर आली होती. त्या मुलांनी ५ वेळा नमाज अदा करायला सुरुवात केली होती. मशिदीत जायला सुरुवात केली होती. कुटुंबीयांना याची माहिती मिळाल्यावर मुलांनी झाकीर नाईकच्या प्रभावामुळे मुस्लिम होण्याचं खुळ डोक्यात आल्याची कबूली दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close