विद्यार्थ्यांना नाट्यतंत्र व नाट्य शास्त्राची माहितीसाठी जिजामाता कन्या विद्यालयात बालनाट्य कार्यशाळा व महोत्सव.
नेर :- नवनाथ दरोई
संगीत नाट्य अकादमी नवी दिल्ली सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार द्वारे आयोजित व अव्दैत कलामंच व बहूउद्देशीय विकास संस्था सिंदखेड द्वारा संचालित जिजामाता कन्या महाविद्यालयात या बालनाट्य कार्यशाळेचे उद्घाटन जिजामाता कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा फाटे यांच्या शुभहस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन,दिपप्रजोलीत करून करण्यात आले. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यशाळेचे आयोजक राहुल हळदे,पाॅवर ऑफ मीडियाचे नेर तालुका अध्यक्ष व ज्येष्ठ कलावंत नवनाथ दरोई उपस्थित होते. विद्यालयातील विद्यार्थिनींना राहुल हळदे यांनी नाट्यतंत्र व नाट्यशास्त्र याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यशाळेच्या यशस्वी करिता विद्यालयातील शिक्षक वैभव जगताप, अमजद मिर्झा,आशिष धोटे, शाळेतील कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यशाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याची आव्हान अमोल नगराळे,डॉ. राहुल हळदे जितेंद्र मोहोळ, कलावंत बापूराव रंगारी, संदीप मिसळे, इस्माईल आझाद, अभय सोनटक्के यांनी केले.सूत्रसंचालन सोनल दांडगे प्रास्ताविक राहुल यांनी केले.