वर्ग १२ वी च्या “राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकात गंभीर चूक
लाखांदूर :-बहुजन प्रबोधन मंच, लाखांदूरने मान. संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांना दि. ५-०४- २०२३ ला पत्र पाठवून त्यांच्या द्वारा वर्ग १२ वी साठी २०२० ला प्रकाशित केलेल्या मराठीत “राज्यशास्त्र” व इंग्रजीत “पोलिटिकल सायन्स” या पाठ्यपुस्तकात पृ.क्र. ५७ वर राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, नॅशनल कमिशन फार बॅकवर्ड क्लासेस या संबंधीची माहिती देतांना “सामाजिक व” या शब्दाबरोबर “आर्थिकदृष्ट्या व “सोशियली ॲण्ड” या शब्दाबरोबर “इकानॉमिकली’ शब्द लिहून केलेली गंभीर चूक लक्षात आणून देवून ती लवकरात लवकर दुरुस्त करण्याची विनंती केली आहे.
सविस्तर असे कि, महाराष्ट्र शासनाव्दारे २०१४ ला प्रकाशित “इंग्रजी- मराठी व्दिभाषी आवृत्ती आपला राष्ट्रग्रंथ “भारताचे संविधान” या अनुच्छेद १५(४) व ३४० (१) मध्ये “…. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या …”आणि “….सोशियली ॲण्ड एज्यूकेशनली बॅकवर्ड क्लासेस….” हेच शब्द समूह नमूद आहेत तसेच-
” दि कॉन्स्टिटयूशन (वन हंड्रेड ॲण्ड सेकंड अमेंडमेन्ट) ॲक्ट, 2018 मध्ये अनुच्छेद ३३८ बी (1) मध्ये देअर शाल बी ए कमिशन फार दि ” सोशियली ॲण्ड एज्यूकेशनली बँकवर्ड क्लासेस टू बी नोन ॲज दि नॅशनल कमिशन फार बॅकवर्ड क्लासेस असेच नमूद आहे पूढे त्यात 338 बी (5)(ए), (5)(बी) (5) (सी) व (5)(एफ) मध्ये ” दि सोशियली ॲण्ड एज्यूकेशनली बॅकवर्ड क्लासेस.” असेच नमूद आहे. 342 ए (1) व (2) मध्ये “- • दि सोशियली ॲण्ड एज्यूकेशनली बँकवर्ड क्लासेस -” असेच नमूद असल्यामुळे मंडळाने पाठ्यपुस्तकात “सामाजिक व” या शब्दासोबत ‘आर्थिकदृष्ट्या’ आणि “सोशियली ॲण्ड ” या शब्दासोबत ‘इकॉनामिकली ” हे शब्द छापल्यामुळे २०२० पासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तसेच शिकविले. त्यामुळे शिक्षकांना व विद्यार्थ्यांना चुकीची व असंविधानिक माहिती मिळाली.
म्हणून मंडळांने त्वरीत “सामाजिक व आर्थिकदृष्ट्या” ऐवजी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या” व “सोशियली ॲण्ड इकॉनामिकी’ या शब्दांऐवजी ” सोशियली ॲण्ड एज्यूकेशनली ” शब्द लिहून केलेली गंभीर चूक त्वरित दुरुस्त करण्याची विनंती बहुजन प्रबोधन मंच, लाखांदूरचे अध्यक्ष अनिल काणेकर यांनी निवेदनातून केली असल्याचे कळविले आहे.