बाघोबाने दुचाकीला दिली धडक आणि त्यांची भंबेरी उडाली

तीन ठिकाणी झाले वाघोबाचे दर्शन
यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आणि वाघ आमनेसामने
भंडारा/ नवप्रहार मीडिया
रस्त्याने जात असतांना काही अंतरावर वाघोबाचे दर्शन झाले तरी काय अवस्था होते याचा साधा जरी विचार केला तरी शरीराला दरदरून घाम फुटतो.आणि बोबडी वळते. पण फक्त तुमच्या समोर उभा नव्हे तर बाघोबाने तुमच्या दुचाकीला धडक दिली आणि तुम्ही त्यावरून खाली पडला. त्यातल्या त्यात रस्ता सुनसान असेल तर तुमची काय अवस्था होईल याचा विचार न केलेलाच बरा. असाच प्रसंग पवनी तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी दीपक फुंडे यांच्या सोबत घडला आहे.
उपलब्ध माहिती नुसार बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दिपक फुंडे (रा. आसगांव ता. पवनी) हे त्यांची आई पुष्पा फुंडे यांच्यासोबत भंडाऱ्याहून गावाकडे जाण्यास निघाले. अशातच कोसेवाडी परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या वाघाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीचे संतुलन बिघडले आणि दोघेही खाली पडले. माहिती मिळताच दवडीपारचे क्षेत्र सहायक, बिटरक्षक, पहेलाचे बिटरक्षक यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोसेवाडी परिसरात वन्यप्राण्यांचा दिवसाढवळ्यासुद्धा संचार असतो.
दुसई घटना चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील निमढेला गावातील एका मंदिरात घडला.मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही अंततरावर त्यांना वाघाच्या बछड्याचे दर्शन झाले. एका व्यक्तीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
वर वाघ आणि छताखाली मंदिरातील भाविक अशी परिस्थिती काही काळ निर्माण झाली होती. मंदिरात आलेल्या भाविकांना अगदी जवळून वाघाचे दर्शन घेता आले. मात्र इतक्या जवळून वाघ पाहिल्याने भाविकांची काही काळ घाबरगुंडी उडाली होती. काही वेळानंतर हा वाघ जंगलात दिसेनासा झाला. तोवर भाविकांनी श्वास धरला रोखून धरला होता. एका वन्यजीवप्रेमीने हा व्हिडीओ त्याच्या कॅमेरात कैद केला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चंद्रपूर जिल्हा संपन्न वन्यजीव आणि वन वैविध्याने नटलेला आहे. या जिल्ह्यात एक ऑक्टोबर पासून ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर पर्यटन खुले झाले आहे. मात्र बफर भागातही वाघांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. याच बफर भागात चिमूर तालुक्यातील निमढेला बफरक्षेत्रात रामदेगी येथे असलेल्या विठ्ठल- रुक्माई मंदिराच्या टीनाच्या छताच्या शेजारी वाघ आणि खाली भाविकांची पूजा अर्चना असा प्रकार बघायला मिळाला.
या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या ठिकाणी नेहमीच भाविकांची गर्दी असते. मात्र इथे कधीही वाघ- मानव संघर्ष बघायला मिळालेला नाही. पण छोटा मटका नावाचा वाघाचा बछडा या ठिकाणी सतत वास्तव्याला असतो. मंदिरात भाविक असताना छोटा मटका वाघ पत्राच्या शेजारी उभा होता. दुसरीकडे खाली मंदिरात भाविक आरती करत होते. मंदिराच्या वर वाघ पाहून भाविकांची चांगलीच तंतरली होती. त्याचवेळी बंडा अरविंद नावाच्या वन्यजीवप्रेमीने हे दृश्य कॅमेरात कैद करत सोशल मीडियावर टाकले आहे. आता हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
भाईंदरच्या उत्तन परिसरात बिबट्याचा वावर
भाईंदर पश्चिमेच्या उत्तन गावातील पालखाडी परिसरात बिबट्या दिसल्याने भीतीचे वातावरण पसरलेले पाहायला मिळत आहे. पहाटेच्या सुमारास बिबट्या वावर करत असतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. स्थानिक नागरिकांनी या बिबट्याची सीसीटीव्ही दृश्य संजय गांधी उद्यानात पाठवली असून त्याला रेस्कीयू करण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार या ठिकाणी वन विभागामार्फत आता या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यापूर्वी देखील अनेक वेळा उत्तन परिसरात बिबट्याचा वावर अनेकवेळा दिसून आला आहे.
तिसरी घटना यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात असलेल्या घोन्सा शिवारात घडली. येथे शेतात असलेल्या शेतकरी आणि वाघोबाचा आमना सामना झाला. शेतकरी प्रसंगावधान राखत झाडावर चढला आणि त्याने भाको व मुलांना सावध केले
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील घोन्सा शिवारात मागील दोन वर्षांपासून वाघाचा धुमाकूळ असून, अनेक जनावरांना त्याने ठार केले आहे. त्यानंतर जवळपास वर्षभरापासून या परिसरातून वाघ गायब झाला होता; परंतु, बुधवारी पुन्हा घोन्सा परिसरात वाघाचा प्रवेश झाला आहे.
शिवारातील एका शेतात चक्क वाघ आणि शेतकरी अगदी आमने- सामने आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
वाघाला पाहताच शेतकऱ्याची एकच घाबरगुंडी उडाली व तो तत्काळ झाडावर चढला. त्यानंतर पत्नी व चिमुकल्या मुलांना आवाज देत, त्यांनाही मचाणीवर चढण्यास सांगितले. बुधवारी दुपारी घडलेल्या या थरारक शिवारात घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. रासा येथील बाळू सिडाम यांचे घोन्सा फुलोरा शिवारात शेत आहे. तेथे प्रकाश मारोती आत्राम आपल्या परिवारासह शेतकाम करत होता. दुपारी अचानक समोर वाघ येऊन उभा चक्क राहिला. त्याला पाहताच प्रकाशची एकच भंबेरी उडाली. वेळ न दवडता तो झाडावर चढला.
समोरच काही अंतरावर पत्नी आणि लहान मुले होती. त्यांना त्याने पटकन काळ मचाणीवर चढण्यास सांगितले. प्रकाश झाडावर चढल्यानंतर वाघ त्या देत, झाडाच्या खाली काहीवेळ उभा होता. प्रकाशला काय करावे ते सुचत नव्हते. मुलेही घाबरुन जीव मुठीत घेऊन मचाणीवर बसली होती. ही माहिती गावकऱ्यांना मिळताच, स्थानिक युवकांनी आरडाओरडा करत शेताकडे धाव घेतली. यावेळी त्यांनी शेतात असलेल्या वाघाला हुसकावून लावले; परंतु, प्रकाशच्या प्रकाशच्या मनात मनात धडकी भरल्याने तो झाडावरून खाली उतरायला तयार नव्हता. काही वेळानंतर गावकऱ्यांनी प्रकाश, त्याची पत्नी व मुलांना सुखरूप बाहेर काढले. या परिसरात वाघाचा प्रवेश झाल्याने शेतकरी व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.