हटके

बाबा वेंगाच्या त्या भविष्य वाणीने जगाची चिंता वाढवली

Spread the love

       वयाच्या 11 व्या वर्षी डोळ्याची दृष्टी गमावलेल्या बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यावण्या खऱ्या ठरत आल्या आहेत. सन2022 मध्ये केलेल्या त्यांच्या 2 भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी 2023 साठी जी भविष्यवाणी वर्तविली आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.

1911 मध्ये जन्मलेल्या बाबा वेंगी यांची वयाच्या 10-11 व्या वर्षी दृष्टी गेली. दृष्टी गमावल्यानंतर, त्यांची मानसिक क्षमता वेगाने विकसित होऊ लागली. बाबा वेंगा यांचे 1996 मध्ये निधन झाले, त्यानंतर त्यांचे अनुयायी त्यांच्या भाकितांबद्दल जगाला सांगू लागले.

दरम्यान, लहानपणापासून अंध असूनही, त्यांनी असाधारण मानसिक क्षमता विकसित केली, ज्यामुळे त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली. बाबा वेंगा यांनी 9/11 चा दहशतवादी हल्ला , फुकुशिमा आण्विक आपत्ती आणि ISIS चा उदय यांसह अनेक घटनांचे अचूक भाकीत वर्तवल्याचे सांगितले जाते. त्यांच्या अनुयायांचा असा विश्वास आहे की, बाबा वेंगा यांनी 5079 साली जगाचा अंत होईल, असे भाकित वर्तवले होते.

सध्या या वादळाबाबत शास्त्रज्ञांची चिंताही वाढली आहे. विज्ञान सांगते की, दर 11 वर्षांनी सूर्य सक्रिय होतो. ही सौर क्रिया त्याचाच परिणाम आहे.आता, बाबा वेंगांच्या भाकितांबद्दल बोलूया… ज्याबद्दल सर्व शास्त्रज्ञ  चिंतेत आहेत. बाबा वेंगा यांनी भाकित वर्तवले होते की, 2023 मध्ये पृथ्वीवर एक वादळ धडकेल.

याआधी 2024 किंवा 2026 मध्ये तो पाहायला मिळेल असे बोलले जात होते. पण आता ते 2023 मध्येच कहर करण्याच्या तयारीत आहे. त्याला सोलर मॅक्सिमम देखील म्हणतात. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ही सोलर मॅक्सिमम 19 एप्रिल 2023 रोजी धडकू शकते.

त्याचा परिणाम 20 एप्रिल 2023 रोजीही दिसून येईल. मात्र यामुळे पृथ्वीवर समस्या निर्माण होऊ शकतात. सूर्याच्या सक्रिय अवस्थेत सौर ज्वाला मोठ्या प्रमाणात विद्युत चुंबकीय ऊर्जा सोडतील. त्यामुळे पॉवर ग्रीड आणि जीपीएस सिग्नलसह सर्व प्रकारची यंत्रणा विस्कळीत होऊ शकते. त्याला सोलर मॅक्सिमम देखील म्हणतात.

सोलर मॅक्सिमम एपिसोड अंदाजे दर 11 वर्षांनी होतात. तसे, गेल्या काही वर्षांत, यामुळे कोणतीही मोठी समस्या दिसली नाही. त्यामुळे उपग्रहांमध्ये शॉर्ट सर्किट होऊ शकते. यासोबतच पृथ्वीवरील पॉवर ग्रिडवरही चुकीचा परिणाम होऊ शकतो.सोलर मॅक्सिममदरम्यान सूर्यामध्ये विस्फोट होतात. यामुळे, सूर्याच्या बाह्य पृष्ठभागावरुन कोरोनल मास इजेक्शन होते आणि त्याचा पृथ्वीवर परिणाम होतो.

त्याची तीव्रता वाढल्यास पृथ्वीच्या कक्षेत उपस्थित असलेल्या अंतराळवीरांसाठी धोका निर्माण होऊ शकतो. जेव्हा हे सौर वादळ पृथ्वीवर आदळते तेव्हा मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित होताना दिसतो. त्यामुळे दळणवळण आणि वाहतूक व्यवस्था कोलमडू शकते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
2
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close