कोहळी समाज विकास मंडळ भंडारा ची नूतन कार्यकारिणी गठीत
डॉ यशवंतजी लंजे यांची अध्यक्षपदी फेरनिवड
भंडारा/ प्रतिनिधी
कोजागिरी पोर्णिमेचे औचित्य साधून रविवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी शहरातील नामांकित डॉक्टर योगेश जी नाकाडे यांचे घरी शहरातील कोहळी समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये कोहळी समाज विकास मंडळ भंडारा च्या नूतन कार्यकारिणी ची निवड समाजबांधवानी मा डॉ यशवंतजी लंजे यांच्या अध्येक्षतेखाली लोकशाही पध्दतीने केली.तसेच यावेळी नूतन सदस्यांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. सदर कार्यकारिणी तीन वर्षांकरिता असून समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणार असल्याचे नूतन अध्यक्ष डॉ यशवंतजी लंजे यांनी सांगितले.*
*कोहळी समाज विकास मंडळ भंडारा ची नूतन कार्यकारिणी खालील प्रमाणे आहे.अध्यक्ष डॉ यशवंतजी लंजे,उपाध्यक्ष डॉ पतीरामजी डोंगरावर,सचिव डॉ राजेशजी कापगते,सहसचिव डॉ खुशालजी बोरकर,कोषाध्यक्ष संजयजी खुणे,सदस्य वामनजी गायकवाड,डॉ दशरथ कापगते,पुंडलिक डोंगरवार, धनराजजी काशिवार, नरेशजी गोबाडे, गोविंदजी कापगते,मुरलीधरजी नाकाडे,सहसरामजी बन्सोड,सेवकजी हातझाडे,युवराजजी कापगते, कैलासजी बुद्धे,चंद्रकांतजी बाळबुद्धे, सौ मंगलाताई गौपले, सौ मालती ताई परशुरामकर,सौ छायाताई कापगते,सौ दिपाताई गोबाडे*