अविनाश टाके यांची महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड

आर्वी / प्रतिनिधी
……………
सामाजिक, वैचारिक, क्षेत्रात नेहमी सक्रियपणे व इमानेइतबारे हिरारिने , सहभाग घेणारे आर्वी येथील होतकरु शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते तथा अनेकांना मदतिचा निरतंर हात देणारे, मितभाषी, निगर्वी स्वभावाचे श्री अविनाश ल.टाके यांची श्री संताजी अखिल भारतीय तेली संघटना महाराष्ट्र राज्य नागपूर मधील मोफत वधू-वर सूचक मंडळाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावरती नियुक्ती श्री अनिल बजाईत प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, वैचारीक क्षेत्रातील अनन्यसाधारण कामगिरीच्या आधारे त्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे स्वागत अनेक मान्यवरांनी केले असून त्यामध्ये संघटनेचे सर्वेसर्वा व प्रदेश अध्यक्ष श्री अनिल बजाईत, प्राध्यापक सुरेन्द्रजी गोठाणे, श्री अरुण कहारे, प्रविण शेलोकार, संजय चिंधेकर, भरत जैसिगपुरे,सतिश शिरभाते, विशुभाऊ आगलावे, कमलेश चिंधेकर, पंकज साकोरे, सुनील टाके,विवेक वासेकर, राजेश टाके, पवन शिरभाते, विनायक जैसिंगपुरे, जीवन आसोले, संदीप लोखंडे, ज्ञानेश्वर जैसिंगपुरे, मनोज गुल्हाणे, सुरज गोधने,नारायण काटकर,प्रशांत अजमिरे ,नितीन खुणे आदिनी भाविवाटचालिसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
………………………