क्राइम

अवैद्य गोवंश वाहतुक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची कार्यवाही.

Spread the love
 १३ लाख ८४ हजाराचा मुद्देमाल जप्त 
अमरावती/ प्रतिनिधी 
स्थानिक गुन्हे शाखेला अवैध गोवंश ट्रक येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनुसार सापळा रचत कारवाई केली असता एम एच ४० ए के ७५७३ या वाहनात ५९ गोवंश आढळून आले. एलसीबी च्या विशेष पथकाने कारवाई करत १३ लाख ८४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 गोपनिय माहीतीदार याचेकडून स्थानिक गुन्हे शाखा चे विशेष पथकास माहीती मिळाली की, एक कंटेनर आयसर क्रमांक एम एच ४० ए के ७५७३ हा असे वाहन गडचिरोली  वरून अमरावती कडे गोवंश भरूण घेवून येत आहे. वरील माहीती वरूण विशेष पथक पो. स्टे. नांदगाव खंडेश्वर हददीत समृध्दी महामार्गावर वाहनाची वाट पाहत असताना वरील क्रमांकाचा ट्रक येताना दिसला. स्था.गु.शा.चे पथकास वाहनाची खात्री पटल्याने त्यांनी सदर वाहन चालकास थांबण्याचा इशारा केला. परंतु वाहन चालकाने वाहन न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला. विशेष पथकातील स्टाफ यांनी नमुद कंटेनर वाहनाचा पाठलाग करून ओवरटेक करून थांबवले. वाहनातील चालक व इतर ३ व्यक्ती यांनी वाहन सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. नमुद वाहनातील लोकांचा अंदाजे १-२ किमी पाठलाग करून पकडण्यात पथकास यश आले. तसेच सदर कंटेनर वाहन क्र एम एच ४० ए के ७५७३ याची आरोपीतां समक्ष पाहणी केली असता त्यामध्ये ५९ गोवंश दाटीवाटीने क्रूरपणे बांधून असलेल्या स्थितीत मिळून आले. ताब्यातील आरोपी यास त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १. कय्युम नूरमहमद खान वय ४५ वर्ष रा. टिपू सुलतान चौक नागपुर, २. अजय शामलाल चौधरी वय ३८ वर्षे रा. योगी अरविंद नगर यशोदा नागपुर, ३. सलीम शेख अफ्तार शेख वय ४४ वर्षे रा. राणीबाग तहसिल नागपुर, ४. मोहम्मद अहिर कुरेशी वय ४४ वर्षे रा. महेद्र नगर टेगा नागुपर असे असल्याचे सांगितले. सदर वाहन व गोवंश बाबत त्यांना सविस्तर विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, सदर गोवंश हे गडचिरोली व वर्धा येथून भरले असुन मोहम्म्द मुदसिर कुरेशी रा. अमरावती याचे सांगण्या वरूण आणले आहेत. सदर गुन्हयात ५९ गोवंश किमंत अंदाजे ३,६४,००० रूपये व कंटेनर आयसर क्रमांक एम एच ४० ए के ७५७३ किमंत अंदाजे १०,००,००० रूपये व आरोपीतांचे मोबाईल किंमत अंदाजे २०,००० रूपये असा एकुण १३,८४,००० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. व ताब्यातील गोवंश गौरक्षण संस्था येथे सुरक्षा व निर्वाह करीता दाखल करण्यात आले. व ताब्यातील आरोपी क्र १. कय्युम नूरमहमद खान वय ४५ वर्ष रा. टिपू सुलतान चौक नागपुर, २. अजय शामलाल चौधरी वय ३८ वर्षे रा. योगी अरविंद नगर यशोदा नागपुर, ३. सलीम शेख अफ्तार शेख वय ४४ वर्ष रा. राणीबाग तर्हासल नागपुर, ४. मोहम्मद अहिर कुरेशी वय ४४ वर्षे रा. महेद्र नगर टेगा नागुपर व इतर ०१ असे यांचे विरूध्द पोलीस स्टेशन लोणी येथे गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री पंकज कुमावत (भा.पो.से.) यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांचे नेतृत्वात विशेष पथक प्रमुख पोउपनि गणेश शिंदे, त्यांचे पथक तसेच ठाणेदार लोणी सपोनि सतिश खेडेकर, पोउपनि प्रविण मोरे व स्टाप यांनी संयुक्तरित्या केलेली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close