
कांरजा प्रतिनिधी /
दि 21/3/23 दुपारी 12:30 मी सविस्तर वृत्त असे की कारंजा ते दारव्हा रोडवर सोमठाणा घाटामध्ये ऑटोसमोर अचानक रुई ( नीलगाय )आडवा आल्यामुळे चार जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती तात्काळ अमोल घोडसाड यांनी श्रीगुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली. त्यांनी तात्काळ श्री गुरुमंदिर रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी जाऊन पेशंटला कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. जखमी हे कारंजा येथील रहिमत नगर येथील
आहेत. त्यांची नावे शबाना बी शाह वय 34 शबाना परवीन बेग वय 23 कलरबेग वय 12 काजील बेग वय 9 हि आहेत.तेथील वैदिक अधिकारी डॉ अकबाणी सर यांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर केले. त्यावेळी मदतीसाठी सिस्टर ढोरे कक्षसेवक देवा कांबळे ब्रदर विनोद चव्हाण पुढील अपघाताचा तपास कारंजा शहर पोलीस स्टेशन करत आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1