अंधश्रद्धेच्या पोटी पाच दिवसांच्या बाळाला दीले बिब्याचे चटके
भयावह प्रकाराणे तालुक्या सह अख्खा जिल्हा हादरला.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
अंधश्रद्धेचा व अशिक्षित पणाचा पगडा अजुनही ग्रामीण भागातील माणसाच्या पाचवीला पुजल्यागतं माणगुटीवरच बसलेला आहे.याचे ज्वलंत प्रकरण घाटंजी तालुक्यातील पारवा पी एस सी येथिल दीनांक ६ जुनं रोजी जन्मलेल्या बाळाच्या पोटदुखी सारख्या आजारावर चक्क बिब्याचे चटके दिल्याच्या भयावह वृध्दय हेलकावे देणा-या घटनेनं कळते. घाटंजी तालुक्यातील पारवा येथे ६ जुनं ला प्रसुती झाल्या नंतर आई- वडील बाळाला घरी घेऊन गेले मात्र बाळ सारखं रडतंय म्हणून त्यांनी कुठल्याही डॉक्टरचा सल्ला न घेता जेष्ठ मंडळी च्या सांगितले प्रमाणे पोटदुखी वरील अंधश्रद्धेचा पोटी अघोरी प्रकार करत चक्क पाच दिवसांच्या बाळाला पोटावर बिब्याचे चटके दिले त्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक झाली. मग भांबावलेल्या अवस्थेत बाळाला यवतमाळ शासकियवृग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांचे बाळाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे कळते. अंधश्रद्धेच्या व अशिक्षित पणाच्या पोटी नाहक नवजात बालकांची ही अवस्था झाली या वृध्दय हेलकाणा-या घटनेनी तालुक्या सह अख: जिल्हा सून्ं झाला आहे.
००००००००००००