माजी आ. राजू तोडसाम यांचा घाटंजी येथे भव्य कार्यकर्ता मेळावा आयेजित.
तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा होणार जाहीर सत्कार
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
आर्णी केळापूर विधानसभेचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते यांनी नुकतेच महाराष्ट्रात नव्याने निवडणूक रिंगणात उतरलेल्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. सी. आर. राव यांचा माझा भारत राष्ट्र समिती या राजकीय पक्षात प्रवेश केला असून तेलंगणा चे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नांदेड येथे झालेल्या जाहीर सभेत राजू तोडसाम यांनी प्रवेश केला आणि मुख्यमंत्री राव यांनी माजी आ. राजू तोडसाम यांच्यावर महाराष्ट्राची मोठी राजकीय जबाबदारी तोडसाम यांचेवर सोपवली असल्याचे सांगण्यात येते. त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन माजी आमदार तोडसाम यांनी कार्यकर्ता मेळावे घेऊन संघटन निर्माण करण्याचा व आपला पक्ष येणाऱ्या काळात कसा मजबूत करता येईल यासाठी घाटंजी तालुक्यातून दि.29 मार्च 2023 रोजी बूधवार ला बाळकृष्ण मंगल कार्यालय खापरी नाका येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे त्या मेळाव्यात तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा जाहीर सत्कार करून माजी आमदार आपली भूमिका मांडणार असल्याचे समजते.त्यासाठी त्यांनी आपल्या सर्व सहकारी व कार्यकर्त्यांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हाहन केले आहे.