क्राइम

नाकाबंदी दरम्यान गावठी दारुसह 12 लाख 82 हजार 500 रु. चा मुद्देमाल जप्त 

Spread the love
आर्वी/  प्रतिनिधी 
              एलसीबी च्या चमूने आर्वी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या सहकार्याने अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवून 12 लाख 82 हजार 500 रु. चा मुद्देमाल जप्त केला आहे.
06/03/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा उपविभाग आर्वी मार्फत पो स्टे आर्वी परीसरात अवैद्य धंदयावर प्रो.रेड कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहितीवरून शनि मंदिर वॉर्ड येथे राहणारा भावेश पाटिल  त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH-32-AS-7067 ने देऊरवाडा आर्वी मार्गे मोहा दारूसाठा घेवून येत आहे अश्या माहिती वरून त्यांचेवर घेराव टाकुन प्रो रेड केला असता आरोपी भावेश हिरामण पाटिल, वय 31 वर्ष, रा. शनी मंदिर वॉर्ड  ता. आर्वी जि. वर्धा
, विकी रतन चव्हाण वय 22 रा. स्टेशन वॉर्ड  ता. आर्वी जि. वर्धा ,बराहुल संतोष राऊत ,वय 26 वर्ष,रा. स्टेशन वॉर्ड  ता. आर्वी जि. वर्धा  ताब्यातील कार व तीन टुयब मध्ये अंदाजे 240 लिटर गवठी मोहा दारूने भरलेल्या 200/- रु. प्रमाणे कि. 48,000,/- रु., 08 प्लॅस्टिक डबकी मध्ये 160 लिटर गावठी मोहा दारू की.32,000/- रू. , 03 रबरी टुयब  ची किं. 900/- रू. , 08 प्लास्टिक डबकी की. 1600/- रु.,एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ कार क्र MH-32-AS-7067 की 12,00,000/- रु.चा माल जप्त करण्यात आला. अप क्र.- 268/24  कलम  65(अ)(ई)+83, म.दा.का नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close