अपघात

आत्ताची मोठी बातमी …लढाऊ विमान कोसळले पायलटचा मृत्यू दोन गंभीर जखमी 

Spread the love

चुरू (राजस्थान )/ नवप्रहार ब्युरो

                चुरू (राजस्थान ) येथून एक धक्कादायक बातमी येत आहे. वायुदलाचे लढाऊ विमान कोसळल्याने पायलटचा मृत्यू झाला आहे तर विमानात असलेले दोन लोक जखमी झाले आहेत. रतनगढच्या भानुदा गावामध्ये ही घटना घडली आहे.

घटनेची माहिती मिळाच राजलदेसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान भारतीय वायूदलाचे असल्याचे सांगितले जात आहे. विमान कोसळल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे झाले. गावानजीकच्या शेतामध्ये हे विमान कोसळलं. विमानाच्या तुकड्यांजवळच पालयचा मृतदेह आढळून आला. पायलटच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या अपघाताचा तपास सुरू केला आहे.

विमान कोसळताना मोठा आवाज झाला अशी स्थानिकांनी माहिती दिली. सध्या घटनास्थळावर मोठी गर्दी झाली आहे. विमान कोसळल्यानंतर आग लागली त्यामुळे घटनास्थळावर धुराचे लोट पसरले आहेत. विमान अपघाताची बातमी सगळीकडे पसरताच रतनगडमध्ये एकच खळबळ उडाली.

जिल्हाधिकारी अभिषेक सुराणा आणि स्थानिक पोलिस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. लष्कराचे बचाव पथकही घटनास्थळी पोहचले आहे. जेणेकरून घटनास्थळ सील करता येईल आणि तपास सुरू करता येईल. गावकऱ्यांनी सांगितले की, विमान अपघातानंतर लगेचच शेतात आग लागली. ही आग गावकऱ्यांनी स्वतःहून विझवण्याचा प्रयत्न केला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close