क्राइम

महिलेची पोलीस अधिकाऱ्या विरोधात तक्रार ; शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप 

Spread the love

अहमदनगर / नवप्रहार डेस्क

            रक्षकच भक्षक बनल्याची अनेक प्रकरणे उघडकीस येतात. सध्या सोशल मीडियावर ऐका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत असून तिने १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याची धमकी दिली आहे. चला तर जाणून घेऊ या काय आहे प्रकरण.

सदर व्हिडीओ हीच माझी सुसाईड नोट समजावी असेही या महिलेने म्हंटले आहे. सदरची महिला ही संगमनेर मधील असून तिचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

यामध्ये तिने म्हटले आहे की, संगमनेर मधील एका पोलिस अधिकाऱ्याने ९ एप्रिल २०२४ रोजी आपल्या कडे शरीर सुखाची मागणी केली. त्यास आपण नकार दिल्यावर त्याने पोलिस ठाण्यात सर्वांच्या समक्ष आपणास अश्लील शिवीगाळ करून अपमानित केले.

या प्रकाराबाबत आपण अनेकदा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र अद्यापही या तक्रारीची दखल घेतली गेली नाही, तसेच त्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईही करण्यात आलेली नाही.

त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण सर्व जनते समोर न्यायाची अपेक्षा करत आहे. जर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्या नालायक पोलिस अधिकाऱ्यावर ८ दिवसांत कारवाई केली नाही

तर आपण येत्या १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार असून त्यास सर्वस्वी तो पोलिस अधिकारी व त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणारे वरिष्ठ पोलिस अधिकारी जबाबदार असतील. हा व्हिडीओच माझी सुसाईड नोट समजावी असेही या महिलेने म्हटले आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातील सत्यता किती हे माहित नाही पण या व्हिडीओने चर्चाना उधाण आले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close