अपघात

मुलगी बघायला निघालेल्या कुटुंबातील सहा सदस्य पोहचले स्मशानात 

Spread the love
 

वाराणसी /नवप्रहार मिडिया

         
              आजमगढ वरून जौनपुर कडे निघालेल्या कार आणि जौनपूरहून केराकतकडे निघालेल्या ट्रक मध्ये धडक झाल्याने कार मध्ये बसलेल्या लोकांपैकी सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन लोक गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भयानक होता की कार चा चक्काचूर झाला आहे.  तर ट्रक रस्त्याच्या कडेला होऊन पलटी झाला आहे.” कार मधील मंडळी मुलगी पाहायला निघाले होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
 अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेले. इतर ६ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर तिघांना पुढील उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आले.
कारमधील कुटुंबिय लग्नासाठी मुलगी बघायला निघाले होते. यात अनिश गजाधर शर्मा, गजाधर लक्ष्मण शर्मा, जवाहर रामप्रताप शर्मा, गौतम जवाहर शर्मा, सोनम बजरंग शर्मा, रिंकू पवन शर्मा यांचा मृत्यू झाला. सर्वजण बिहारच्या सीतामढी इथं राहत होते. बिहारकडून प्रयागराजच्या दिशेने ते जात असताना कारचा अपघात झाला.
केराकतच्या सीओंनी सांगितलं की, अपघातग्रस्त कार आणि ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. अपघाताची नोंद पोलिसात झाली आहे. ट्रक चालक आणि इतर दोघे फरार झाले आहेत. हा अपघात मध्यरात्री अडीचच्या सुमारास झाला आहे. अपघाताचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. ट्रक चालकाचा शोध घेतला जात असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close