अट्टल दुचाकी चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
वरूड/तूषार अकर्ते
मागील काही काळात अमरावती जिल्ह्यातील ग्रामीन भागात वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांचा आढावा घेत सदर दुचाकी चोरीच्या घटनांना प्रतिबंध बसाव तसेच दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करण्याबाबत पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच सर्व पोलिस स्टेशन प्रभारी अधिका-यांना आदेशित केले होते.
दि.९ जुलै रोज रविवार ला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वरूड पोलिस स्टेशन हद्दीत गस्त घालत असतांना आरोपी राजेश पंजाबसिंग भादा (३३) रा.रोहना, ता.पट्टन,जि.बैतुल (म.प्र.) हा संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना दिसुन आला होता.पोलिसांनी आरोपीला थांबविण्याचा प्रयत्न केला असाता त्याने त्याच्या ताब्यातील दुचाकी सुसाट वेगाने पळवुन पसार होण्याचा प्रयत्न केला.पोलीसांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला अखेर ताब्यात घेतले. घडलेल्या गुन्ह्याबाबत त्याला विचारपुस केली असता प्रथम त्याने उडवा-उडवीचे उत्तरे दिली. परंतु पोलिसांनी त्याला शिताफीने विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली तेव्हा आरोपीने बेनोडा पोलीस स्टेशन हद्दीतील दोन दुचाकीची तर अमरावती शहर येथील गाडगेनगर परिसरातील एक दुचाकीची अशा एकुण तीन दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीचे ताब्यातुन एकुन चोरीच्या १ लक्ष ५० हजाराचा तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. सदर आरोपीस पुढील कार्यवाही करिता बेनोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पुढील तपास बेनोडा पोलीस करित आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधिक्षक शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गून्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे, पोलिस उपनिरिक्षक नितीन चुलपार, संतोष मुंदाणे, बळवंत दाभणे, भुषण पेठे, रविंन्द्र बावणे, भुषण पेठे, पंकज फाटे यांचे पथकाने केली आहे.