हटके

शेवटी ती आईच ; तिची कृती पाहून तुमच्या डोळ्यातून देखील अश्रु ओघळणार 

Spread the love

                    आई हे रसायनच वेगळं आहे. मग ती कुठल्या मनुष्याची असो व प्राण्यांची. अपत्यवार येणारे संकट जे स्वतःवर घेते ती आई.स्वतः उपाशी तापाशी राहून मुलांची काळजी घेते आणि दोन घास भरवते ती आई ! मुलांची काळजी फक्त मनुष्याच्या आईनाचं असते असे नाही प्राणी देखील आपल्या पिल्लांची काळजी घेतात. प्राणी देखील किती संवेदनशील असतात याचा प्रत्यय एका कुत्रीने आणून दिलाय.

अडचणीच्या वेळी ती आपला जीव धोक्यात घालून, मुलांना संकटातून वाचवते. हे केवळ माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही घडते. पण, ज्या पिल्लाला खेळवत खेळवत लहानाचे मोठे केले, त्या पोटच्या पिल्लाचा अचानक मृत्यू झाल्यावर तिला किती वेदना झाल्या असतील याची फक्त कल्पना करा. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; जो पाहिल्यानंतर तुमचेही डोळे ओलावल्याशिवाय राहणार नाहीत.

हृदय पिळवटून टाकणारे दृश्य

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीला स्मशानभूमी किंवा दफनभूमीपर्यंत नेण्यासाठी चार खांदे असतात. पण, एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाला, तर त्याला दफन करण्यासाठी कोणीही येत नाही. अशाच प्रकारे एक कुत्री अन् तिच्या पोटच्या मृत पिल्लाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कुत्री जड अंत:करणाने मृत पिल्लावर माती टाकून, तो मृतदेह गाडण्याचा प्रयत्न करीत आहे. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे आहे.

व्हिडीओ पाहताना डोळे येतील भरून

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, कुत्री आपल्या मृत पिल्लाला तोंडात धरून, पायाने कशी माती खोदत आहे; जेणेकरून ती त्याला पुरू शकेल. सुरुवातीला हे दृश्य पाहून तुम्हाला समजणार नाही की, ती नेमके काय करीत आहे; पण नंतर जेव्हा ती खड्डा खणून, त्यात पिल्लाला ठेवते तेव्हा ती काय करत होती ते तुम्हाला समजते. हे करताना त्या आईच्या काळजाला काय वेदना झाल्या असतील याची कल्पना करून डोळे भरून येतील.

डोळ्यात पाणी आणणारा हा व्हिडीओ @Gulzar_sahab नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘कोणत्याही आईसाठी हा सर्वांत जास्त वेदनादायी प्रसंगी आहे; मग तो माणूस असो वा प्राणी.’ अवघ्या २२ सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत २८ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे; तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाइकही केले आहे.

हा भावनिक व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, ‘भावनांची स्वतःची जागा असते.’ दरम्यान, काही युजर्सनी या कुत्रीच्या पिल्लाला श्रद्धांजली अर्पण केली आहेत. तर, काही युजर्सना हा व्हिडीओ पाहून खरेच रडू कोसळले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close