डवरगाव येथे सौ. सुषमा सतीश कोंडे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला पुरस्काराने सन्मानीत…
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
तालुक्यातील डवरगाव ग्रामपंचायत च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सन्मान पुरस्कार सौ. सुषमा सतीश कोंडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत ग्रामपंचायत स्तरावर महिला व बाल विकास या क्षेत्रात काम उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सम्मान पुरस्कार सन्मान करण्यात यावा असे पत्र ग्रामपंचायतला प्राप्त झाले असून त्यानुसार डवरगाव ग्रामपंचायत च्या वतीने अर्ज मागविण्यात आले होते
डवरगाव ग्रामपंचायतला पुरस्कार करिता अर्ज प्राप्त आले होते. त्यामधून हुंडाबळी, साक्षरता , बालविवाह , इतर क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सौ. सुषमा सतीश कोंडे यांचा डवरगाव ग्रामपंचायत स्तरावर निवड समितीने केली असून त्यांना आज ( दि. ३१) ला ग्रामपंचायत सभागृहात सन्मानपत्र, सन्मान चिन्ह तसेच शाल श्रीफळ व रोख पाचशे रुपये देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी डवरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री चिकटे ,उपसरपंच प्रफुल तायडे ग्राम विकास अधिकारी वनिता चव्हाण ग्रामपंचायत सदस्य विजय तुळे ,राजू कपिले , लक्ष्मण भांडे , सुनिता तायडे ,पोलीस पाटील कविता लुगे , तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत तायडे , मुख्याध्यापक नंदकिशोर झाकार्डे आशा सेविका निता पापळकर , अंगणवाडी सेविका मंगला गावंडे , उषा डांगे , निता पापळकर पाणीपुरवठा कर्मचारी सचिन बनसोड रोजगार सेवक अनिल बोराडे तसेच दिवाकर सावळे राऊत मॅडम वरिष्ठ मंडळी व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते