सामाजिक

अंजनगाव सुर्जी येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव , शिष्यवृत्ती वितरण, व सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार समारंभ संपन्न

Spread the love

अंजनगाव सुर्जी,मनोहर मुरकुटे

भारतीय बारी कर्मचारी सामाजिक संस्था, संस्कार अभ्यासिका व संस्कार वाचनालय अंजनगाव सुर्जी चे वतीने नुकताच खोडगाव रोडवरील विठ्ठल मंदिर संस्थान अंजनगाव सुर्जी येथे सन 2022_23 ह्या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थी, गुणगौरव, शिष्यवृत्ती वितरण व सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार कार्यक्रम दिनांक 27नोव्हेंबर ला आयोजित करण्यात आला होता ह्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रविंद्रजी पाटील, प्रमुख मार्गदर्शक डाॅ.प्रा.अरविंदजी लाडोळे बुटले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दिग्रस, विशेष उपस्थिती प्रशांतजी लाडोळे अमेरिका,प्रमुख अतिथी श्री निळकंठराव यावले माजी गटशिक्षणाधिकारी,
डाॅ.निलेशकुमार इंगोले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, कमलकांजी लाडोळे माजी नगराध्यक्ष न प अंजनगाव, संगीताताई दूधे कृषी रत्नपुरस्कार प्राप्त,समाजभुषण श्री तुळशीरामजी भोंडे, शिष्यवृत्ती देणगीदार प्रशांत लाडोळे, उमेश भोंडे, ज्योतीताई माकोडे,नवनियुक्त पदाधिकारी श्री राजैंद्रजी यावूल सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदुरबाजार,संस्थेचे अध्यक्ष रविंद्र येउल, पहेलवान निलेश आवंडकार हे मंचावर उपस्थित होते तर
ह्यामध्ये आय ,आय, टी ,एम बी बी एस , एम डी, एम एस, एन एम एन एस,बी ए, बी एस सी, वर्ग 12 वी, वर्ग 10 वी,5वी 8 वी शिष्यवृत्ती उत्तीर्ण यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी यांना प्रशस्तीपत्र, मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक दाभाडे यांनी केले.
याप्रसंगी रविंद्रजी बोडखे माजी उपाध्यक्ष न प अंजनगाव,उल्हासराव नाठे,रामदासराव पाटील, प्रल्हादराव आवंडकार, गजानन भावे,मनोहरराव मुरकुटे ,निळकंठराव यावले,गणेशराव बोडखे,राजूजी पाटील, ज्योतीताई पाटील ,हिम्मतराव माकोडे,लक्ष्मणराव येउल , सुखदेवराव भावे , हरिदासजी माकोडे,विनोद हेंड,मनोहर नाठे,मधुसूदनजी गुजर , गणेशराव बोडखे , सौ तृप्ती नरेंद्र दाभाडे , देविदास रेखाते, सौ उषाताई गुजर , सौ ज्योतीताई पाटील ,गणेशराव टीपरे,दिनेशभाऊ भोंडे,राजेश अस्वार माजी सैनिक ,ज्योतीताई पायघन,ह्याच्या देणगीतून गितांजली अस्वार,वेदांत येऊल,वेदांत कपले,गायत्री डाबरे,प्रणोती माकोडे, योगेश आवंडकार, भाग्यश्री गुजर,स्नेहल आवंडकार, गायत्री सातपुते, कुणाल धर्मे,नेहा रेखाते,मेघा दातीर,गायत्री रेखाते, समृध्दी बानाईत,संजना भोंडे, शाम रेखाते, ऋषिकेशअस्वार, मोहीनी मुरकुटे,अभिषेक नाठे,दीक्षा अस्वार, ऋषिकेश सोनटक्के, शौर्य रेखाते, आरूषी धुळे, उत्कर्ष हेंड,स्वराज भावे,देवांशू अरबाड, परिक्षीता नाठे, धनश्री येऊल, पयोष्णी कळमकर,कृतिका माकोडे,राधा आवंदकार,प्रेरणा टिपरे, जान्हवी मुरकुटे, प्रियंका लाडोळे,यांना 38 हजार रू.बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
वर्ग 12 वी नंतर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षणाकरिता प्रवेशीत , गरजू गरीब विध्यार्थी यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृत्ती म्हणून प्रशांतजी लाडोळे ह्यांचे कडून 40 हजार रु. ,उमेशजी भोंडे ह्यांचे कडून 22, हजार रुपये, श्रीमती ज्योती रविंद्रजी माकोडे ह्यांचे कडून 11,000 रू.शिष्यवृत्ती वितरण करण्यात आली.ही शिष्यवृत्ती प्रिया सातपुते ,प्रज्वल थोरात, वैष्णवी धर्मे,गौरी आवंडकर,ओम अंबडकर,ओम दाभाडे यांना 73हजार रू शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली.कार्यक्रमाचे अतिथी श्री निळकंठराव यावले सर यांनी याप्रसंगी संस्थेला 11 हजार रुपयाची देणगी जाहीर केली. तसेच संस्कार अभ्यासिकेला श्री प्रशांतजी लाडोळे यांनी वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली त्याचे उद्घाटन करण्यात आले. समाजातील वेगवेगळ्या विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी सभासदांचा सत्कार समारंभ संपन्न झाला .सत्काराला उत्तर देताना श्री चंद्रशेखरजी नेमाडे व श्री विश्वनाथ दाभाडे ह्यांनी आपल्या मनोगतातुन समाजाप्रती ऋण व्यक्त केले
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव विनायक दाभाडे, सहचचिव गजानन येउल, कोषाध्यक्ष विजय भोंडे, संचालक देविदास रेखाते, चंद्रशेखर नेमाडे, शाम कळमकर , गणेश टिपरे,आनंद थोरात, गणेश बोडखे, राजेश अस्वार, गोपाल सिनकर, सुभाष थोरात, सौ सविताताई रेखाते, मनोहर नाठे,श्रीकृष्ण रेखाते,सौ सुनंदाताई कतोरे, संजू ताडे , सौ ज्योती पाटील, विनोद सोनटक्के, नरेंद्र आवंडकर, प्रविण रेखाते,शाम नाठे व इतरही समाज बांधव यांनी अथक परिश्रम घेतले , कार्यक्रमाचे संचालन सौ संगीताताई येउल, सौ.सविताताई रेखाते, सौ नंदाताई ताडे ,सुखदेव भावे, नरेंद्र आवंडकर, गजानन येऊल ह्यांनी केले तर आभार संस्थेचे अध्यक्ष रविंद्र येउल ह्यांनी मानले

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close