तहसीलदार यांच्या आश्वासना नंतर उपोषण मागे
रणधीर चव्हाण व गावकऱ्यांच्या प्रयत्नाला आले यश.
यवतमाळ वार्ता
अरविंद वानखडे
जिल्ह्यातील तिवसा येथील रेशन दुकान रद्दच्या आदेशानंतरही पूर्ववत सुरू असल्याचा आरोप करीत संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी, अशा आश्ययाची मागणी करीत तिवसा येथील सरपंच,ग्रामस्थ,सामाजिक कार्यकर्ते रणधीर चव्हाण हे बेमुदत उपोषणावर यवतमाळ येथे बसले आहे.
तहसीलदारांच्या आदेशानुसार हे दुकान जोपर्यंत दुसऱ्या दुकानाला जोडणार नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका घेतली आहे. तिवसा येथील सरपंच नरेश राठोड आणि सामाजिक कार्यकर्ते रणधीर चव्हाण यांनी तिवसा येथील रास्त भाव दुकानाच्या कारवाईसाठी बेमुदत उपोषण मंगळवारपासून सुरू केले होते.
या उपोषणकर्त्यांनी श्री दत्त महिला बचत गटाच्या धान्य वाटपात गैरव्यवहार झाल्याच्या आरोप त्यांच्यावर आहे.
त्यामुळे श्री दत्त महिला बचत गट रास्त भाव दुकान मोजा तिवसा हे रास्त भाव दुकान मोजा इचोरी दुकानदार मारोती सारवे यांच्या रास्तभाव दुकानास जोडण्यात आल्याचे आदेश तहसीलदार यांनी केले आहे.तसेच उपोषण कर्त्याच्या मंडपात शिरभाते यांनी भेट देऊन तहसीलदार यांच्याशी दूरध्वनी वरून बोलणे केले. लेखी आश्वासनाची प्रत देऊन त्यांना आपले आंदोलन व उपोषण रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली त्यावेळी उपोषणकर्त्यांनी सुद्धा आपले उपोषण मागे घेत असून अशा भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात आमचा लढा असाच सुरू राहणार अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी केली.