अशोकराव देशमुख यांना “सहकार भूषण” पुरस्कार प्रदान..!!

अकोले /प्रतिनिधी
नुकताच व्हाईस ऑफ मीडिया व आमदार डॉक्टर किरणजी लहामटेसाहेब मित्र मंडळ अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटेसाहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अकोले तालुक्यात सुरु करण्यात आलेल्या “अकोले महोत्सव – २०२५” निमित्त तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकरसाहेब व पदमश्री राहिबाई पोपरे यांच्या अध्यक्षतेखाली अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तसेच अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक अशोकराव भाऊसाहेब देशमुख(आण्णा) यांना तालुक्यातील विविध सहकारी संस्थेवर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सहकार क्षेत्रातील “सहकार भूषण” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आण्णांचा ऊस लागवड व खानणीपासून सुरु झालेला प्रवास हा आज गावचे सरपंच,सोसायटीचे संचालक, विविध पतसंस्थेवर संचालक, व्हा.चेअरमन,दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,अगस्ती कारखान्याचे संचालक,तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन पर्यंतचा संघर्षमय प्रवास हा खरं तर तालुक्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.या सर्व संस्थेवर काम करत असतांनी आण्णांनी तालुक्यातील शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन अनेक योजना राबवल्या त्यामध्ये प्रामुख्याने नदीवरून सामुदायिक पाईपलाईन,नदीवर आत्ताचे केटीवेअर आहे त्याची सुरवातदेखील आण्णांनीच केली पक्क्या केटीवेअरला परवानगी नसल्यामुळे आण्णांनी गावातील शेतकरी एकत्र करत नदीतीलच दगडानपासून नदीत बांध घालत पाणीसाठा उपलब्ध केला,तो साठा नदीचे रोटेशन संपल्यानंतर देखील 15 दिवस वापरात यायचा नंतर केटीवेअरची संकल्पना आली व कळस पासून अनेक केटीवेअर बांधले गेले उन्हाळ्यातही मोठी पाण्याची उपलब्धता झाली.जिजामाता महिला दूध संस्था उभी करत अनेक महिलांना सक्षम करण्यास मदत केली त्या संस्थेच्या मध्येमातून अनेक उत्पादक महिलांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी वित्त पुरवठा केला जाई.पतसंस्थेच्या मध्येमातून अनेक शेतकरी,उद्योजक यांना नियमानुसार वित्तपुरवठा करत खाजगी सावकारशाहीला आळा घालण्याचा प्रयत्न केला.अगस्ती सहकारी साखर कारखान्यात गेली २२ वर्षांपासून संचालक म्हणून काम करत असतांनी आण्णांनी इंदोरी गट व प्रवरा पट्ट्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसलागवडीसाठी प्रोत्साहीत केले.हा सर्व सहकारतील आण्णांचा अनुभव बघता सन २०२२ साली अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व जिल्हा सहकारी बँकेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक सीताराम पाटील गायकसाहेब यांनी तालुक्यातील अग्रगण्य तालुक्यातील पतसंस्थांची मातृ संस्था असलेल्या अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची जबाबदारी आण्णांना चेअरमन करत दिली.आण्णांनी गेली २ वर्षांपासून ती लिलया पेलत वसुलीवर भर देत पतसंस्थेचा कारभार अगदी सुरळीत आणला आहे.आण्णांची ओळख रोकठोक व शिस्तीसाठी असल्यामुळे आज संस्थेच्या स्टाफमध्ये देखील एकसूत्रता दिसते व आदरयुक्त धाक जाणवतो,शिस्तीसाठी आण्णा कडक जरी असले तरी कारखाना असो किंवा पतसंस्था कुठल्याही कर्मचाऱ्याच्या सुख दुःखात आण्णा नेहमीच सहभागी असतात.अनेक नेत्यांचं राजकारण व समाजकारण हे नात्यागोत्यांवर अवलंबून असतं परंतु आण्णा याला अपवाद ठरतात कारण आण्णांचे नातेसंबंध हे बहुतांशी तालुक्याच्या बाहेर आहे परंतु आपल्या नेत्यावरील निष्ठा व ज्याच्यासोबत राहायचं त्याच्यासोबत प्रामाणिकपणे व निष्ठेनं राहायचं हे तत्व पाळल्यामुळं आज आण्णा इतर नेत्यांपेक्षा उजवे वाटतात.म्हणून आज “सहकार भूषण” पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे आण्णांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.