सामाजिक

होलीफेथ इंग्लिश प्राइमरी स्कूल मध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

Spread the love

हिवरखेड

बाळासाहेब नेरकर कडून

 

स्थानिक हिवरखेड येथील अग्रगण्य असलेले होलिफेथ इंग्लिश प्राइमरी स्कूल हिवरखेड येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली.यामध्ये विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत आले .तर विद्यार्थिनी रुक्मिणीच्या वेशभूषेत आल्या विठ्ठलाच्या वेशभूषात पार्थ पिसोळे तर रुक्मिणीच्या वेशभूषात साक्षी कुकडे यांनी विशेष वेशभूषा केली होती .तसेच शालेय परिसरातून गावात वारी दिंडी काढण्यात आली. या दिंडीची विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी ग्रंथ दिंडी काढली यातून ग्रंथ हेच गुरु ग्रंथा विषयीचे महत्त्वाचा संदेश जनतेला दिले सोबतच वृक्षदिंडी काढून “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” झाडे लावा झाडे जगवा असे नारे लावून विद्यार्थ्यांनी वृक्षांचे महत्व व संवर्धनाचे संदेश जनतेपर्यंत पोहोचविले नंतर ही दिंडी स्थानिक पांडुरंग संस्थान विठ्ठल मंदिर येथे पोहोचले विठ्ठल दर्शन घेऊन रस्ता दुतर्फा वृक्षारोपण करून छोट्या छोट्या वारकऱ्यांनी वृक्ष संवर्धनाचे संदेश दिले अशा या अनोख्या पद्धतीने गावात प्रथमच आषाढी एकादशी साजरी केली .तसेच मुलांची कौतुक करण्याकरता व त्यांचा उत्साह द्विगुणीत करण्याकरता गावातील प्रतिष्ठित नागरिक व शाळा समितीचे सदस्य ,पालकवर्ग सुद्धा हजर होते. .यामध्ये गावाचे पोलीस पाटील श्री प्रकाशजी गावंडे, नीलकंठराव देशमुख, (उपाध्यक्ष इंग्लिश स्कूल) श्री मनीषजी गिऱ्हे सर,जगन्नाथ महाकाळ ,वार्ताहर मनोज भगत अरुण रहाणे तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका कल्पना अस्वार मॅडम, प्रिया वालचाळे, सीमा रहाटे , शीतल अग्रवाल ,सीमा सोनोने ,पल्लवी फोपसे , सोनू कुऱ्हाडे ,वैशाली गवई, कुमुदिनी ढेंगेकर,प्रतिभा वायकर,राजाराम भाऊ इंगळे यांचे विशेष सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close