विदेश

अस कधी व्हतंय व्हय ..!   प्रेयसीला किस केल्याने प्रियकर झाला बहिरा

Spread the love

चीन /नवप्रहार मीडिया

                    जगात अश्या काही घटना घडत असतात ज्यावर सहसा विश्वास बसत नाही.सध्या सोशल मीडियावर एका विषयाला घेऊन जोरदार चर्चा सुरू आहे. चीन मध्ये ही घटना घडली असून प्रियकराला प्रेयसीने इतक्या जोराने किस केले केले की त्याची श्रवणशक्ती हरपली आहे. मुख्य म्हणजे प्रेमात लोक आंधळे होतात हे नेहमीच ऐकतो पण प्रेमात बहिरे झाल्याचा हा पहिलाच प्रकार असावा.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विचित्र आणि मजेशीर प्रकरण चीनमधील आहे. येथील एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीला १० मिनिटे किस केल्यानंतर त्याची ऐकण्याची क्षमता कमी झाली होती. ही बातमी ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून सध्या या प्रकरणाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, चीनी व्हॅलेंटाईन डे (२२ऑगस्ट) रोजी एक प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांना किस करत होते. यावेळी प्रियकराच्या कानात अचानक एक विचित्र आवाज आला आणि त्याच्या कानात तीव्र वेदना सुरू झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, हे जोडपे चीनच्या पूर्व झेजियांग प्रांतातील वेस्ट लेकवर डेटसाठी पोहोचले होते, त्याचवेळी एकमेकांना किस करताना हा अपघात झाला.

तरुणाला त्याच्या कानांनी नीट ऐकू येत नाहीये शिवाय त्याच्या कानात प्रचंड वेदना होत असल्याचे लक्षात येताच हे जोडपे हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी तपासणी करून कानाचा पडदा फाटल्याचे सांगितले. डॉक्टरांनी तरुणाची तपासणी केल्यानंतर त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी दोन महिने लागतील असे सांगितले.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की जास्त उत्साहाने किस घेतल्याने शरीरात कंप निर्माण होतात, त्यामुळे कानाचा पडदा ताणला जातो. उच्च दाब आणि शरीरात वेगाने होणारे बदल यामुळे कानाचा पडदा फुटू शकतो. मात्र, अचानक ऐकू न येण्याची ही पहिलीच वेळ नाही. २००८ मध्येही अशीच एक घटना समोर आली होती, ज्यामध्ये एका चिनी महिला तिच्या प्रियकराचे चुंबन घेत असताना तिने स्वत:ची श्रवणशक्ती गमावली होती. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, मागील महिन्यात दक्षिण चीनमधील एका जोडप्याची घरात टीव्ही पाहत असताना श्रवणशक्ती गेली होती.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close