वर्धा / प्रतिनिधी
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आर्वी विधानसभा उपाध्यक्ष आशिष गावंडे यांनी निवडणुकीत नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
तळेगाव येथील निवासी आणि संघाचे शरदचंद्र पवार गटाचे आर्वी विधानसभा मतदार संघाचे उपाध्यक्ष आशिष ज्ञानेश्वर गावंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा अध्यक्ष गोपाल मरसकोल्हे आणि अनंतराव झाडे यांच्याकडे सोपवला आहे. जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी गावंडे यांचा राजीनामा स्वीकारला असला तरी अध्याप त्यावर कुठलाही निर्णय झाला नसल्याचे आणि तो राजीनामा पक्षश्रेष्टींकडे पाठवण्यात येणार असल्याचे संबंधितांनी सांगितले.
नियोजनाचा अभाव हे सांगितले राजीनाम्या मागील कारण – आशिष गावंडे यांनी आपल्या राजीनाम्यात मतदार संघात पक्षाचा अधिकृत उमेदवार असतांना देखील अध्यापही त्यांच्याकडे कुठलीही जबाबदारी सोपविली नसल्याने पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यात नियोजनाचा अभाव असल्याचे आढळून येत असल्याने पदाचा राजीनामा देत असल्याचे राजीनाम्यात नमूद केले असल्याचे समजते.