जाजू इंटरनॅशनल स्कूलमध्ये शंकराचार्य श्री श्री शंकर भारती महास्वामी यांचे आगमन
यवतमाळ। / प्रतिनिधी
श्री योगानंदेश्वर सरस्वती पीठ कृष्णराज नगर मैसूर येथील पिठाधिपती श्री श्री शंकर भारती महास्वामीजी आध्यात्मिक आणि वैज्ञानिक संस्थान वेदांत भारतीचे अग्रणी मार्गदर्शक आहेत. उत्तर भारताच्या विजय यात्रेच्या दरम्यान जाजू इंटरनॅशनल स्कूल यवतमाळ येथे दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी पूज्य गुरूवर्यांचे आगमन झाले.
येदतोर श्री योगानंदेश्वर सरस्वती, कृष्णराज नगर जिल्हा मैसूर मध्ये हेकावरी नदीच्या काठावर असलेल्या मठाच्या रूपाने एक प्रसिद्ध संस्थान आहे. या मठाची ८०० वर्षांपूर्वी स्थापना झाली असून अध्यात्मिक आणि सामाजिक कार्य तेथे चालते. “मनुष्याच्या व्यक्तिगत उन्नतीतूनच सामाजिक व राष्ट्रीय उन्नती होऊ शकते”, या भावनेनेच ते भारतीय संस्कृती, सनातन धर्म व अध्यात्मातून शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी सतत कार्यरत असतात. त्यांच्या आश्रमात वर्षभरात मुंज झालेल्या मुलांसाठी निःशुल्क एक महिना निवासी शिबिर, बटू शिक्षा दिली जाते. ज्यात संध्यावंदन, स्तोत्र आणि मुखपाट मंत्रांचे प्रशिक्षण दिले जाते. डॉक्टर, वकील, शिक्षक, इंजिनियर यांच्यासाठी वैचारिक, अध्यात्मिक चर्चासत्राचे आयोजन केले जाते. तसेच ऑनलाईन पद्धतीने सुद्धा शिक्षण दिले जाते. स्वामीजी वैज्ञानिक दृष्टिकोन समजण्यावर भर देतात. त्यांच्या कार्याशी संबंधित देश-विदेशातील चिकित्सक व चिकित्सा संस्थानांनी शोध कार्य सुद्धा केले आहे. त्यांच्या मते, “योग, प्राणायाम, ध्यानसाधना केल्यास आपले मस्तिष्क मजबूत होते. स्मरणशक्ती व आकलनक्षमता वृद्धिंगत होते.
शाळेतील विद्यार्थ्यांना एका विद्वान व्यक्तीच्या कार्याची माहिती व्हावी, मौखिक अभ्यास पद्धती अवलोकन करून विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत व चिंतनशीलतेत वाढ व्हावी, संस्कृतीची माहिती व्हावी, गुरूकुल पद्धती मुलांना ज्ञात व्हावी या उद्देशाने महास्वामी शंकराचार्य श्री श्री शंकर भारती यांचे आगमन शाळेच्या आवारात होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रकाशजी जाजू सर, सचिव माननीय आशिषजी जाजू सर, संचालक प्राचार्या सौ शिल्पा जाजू मॅडम, सौ, पुनम जाजू सहित संपूर्ण जाजू परिवार, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंजिरी रासपायले मॅडम, समन्वयिका सुचिता पारेख आणि वैशाली तुरक मॅडम, पालकवर्ग, संचालक मंडळ, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
————————————————————-