ब्रेकिंग न्यूज

वर्ध्यात धुनिवाले मठ परिसरात सशस्त्र दरोडा

Spread the love
आई आणि मुलाला बांधून चार दरोडेखोरांनी मारला दागिने व रोख रकमेवर डल्ला
वर्धा / आशिष इझनकर
             शहरातील धुनिवाले मठ परिसरात रात्री 3 वा. च्या सुमारास दरोड्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी घरात असलेल्या आई आणि।मुलाला दोराने बांधून कपाटातील नगदी रक्कम आणि सोने लुटून नेले आहे. दरोडेखोरांनी दोघांना ओरडण्यास मनाई केली होती. परंतु मुलगा ओरडल्याने दरोडेखोरांनी त्याच्या डोक्यावर चाकूने मारून त्याला जखमी केले आहे. या घेटनेने शहरात खळबळ माजली आहे.
रात्रीला घराच्या मागच्या दाराची कडी तोडून चोरट्यानी घरात प्रवेश केला. घरात चोर शिरताच कुटूंबियांनी आरडा – ओरडा केलाय. चाकूचा धाक दाखवत ओरडणाऱ्या कुटुंबातील बारावीत शिकणाऱ्या मुलावर चाकूने वार करून जखमी केलेय. या घटनेत पर्समधून 30 हजार रुपयांची रोख रक्कम आणि चार ग्राम सोने चोरट्याने चोरून नेलेय. सदर घेतनेची तक्रार वर्धा पोलिसात करण्यात आली असून पोलिसांनी  घटनेची दखल  घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे.
                  मी आणि माझा मुलगा घरात झोपलो असतांना रात्री अंदाजे 3 वा. च्या सुमारास चार लोकांनी घरात प्रवेश केला.त्यांना पाहुन मी आणि माझा मुलगा ओरडायला लागले.।त्यावर त्यांनी आवाज करू नका . आमचे जवळ चाकू आहे अशी दमदाटी केली. पण त्यांनतर देखील माझा मुलगा ओरडल्याने त्यांनी त्यांच्या डोक्यावर चाकूने वार केला. त्यांनी कपाटाच्या किल्ल्या मागितल्या. मी त्यांना किल्ल्या दिल्यावर त्यांनी कपाटात असलेल्या पर्स मधील नगदी 30 हजार आणि अंदाजे 4 ग्राम सोने घेऊन गेले. जातांना त्यांनी बाहेर पडण्याचा रस्ता विचारला आणि खाली किती लोक राहतात  या बद्दल विचारणा केली. आणि निघून गेले.
                                             
                                भावना बहाळे,                                           पीडित
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close