हटके

 अरे यांना येड लागलंय की काय ? या देशाने आयोजित केली ‘ रतिक्रीडा ‘ स्पर्धा

Spread the love

स्वीडन / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                       काही देशात  सेक्स वर बोलणे तर सोडा सेक्स (sex) शब्द देखील उच्चारला तरी आजूबाजूला उपस्थित लोकांचे कान उभे आणि डोळे विस्फारले जातात. पण काही देशात ही बाब खुली आहे. ती इतकी की आपल्या सारख्या एखाद्या व्यक्तीला रस्त्यावर त्यांचे एकमेकांना आलिंगन देणे आणि चुंबन घेणे पहावले जात नाही. पण स्वीडन या देशाने ‘रतिक्रीडा ‘ स्पर्धा करून कमालच केलं8 आहे. त्यामुळे या देशाला येड लागलंय की काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘स्वीडन सेक्स फेडरेशन’ या सरकारमान्य संघटनेने चक्क पहिली युरोपियन सेक्स चॅम्पियनशिप आयोजित केली आहे. ही स्पर्धा अनेक आठवडे सुरू राहणार असून स्पर्धक जोडप्याला 45 मिनिटे ते एक तासाचा अवधी दिला जाईल. त्यात त्यांनी आपल्या रतीक्रीडेची कला ‘दाखवायची’ आहे.

स्वीडन सरकारचे हे धाडसी पाऊलच म्हणायला हवे. कारण त्यांनी ‘रतीक्रीडे’ला थेट खेळाचा दर्जा दिला आहे. युरोपातील काही देशांमधील 20 स्पर्धक जोडप्यांनी आतापर्यंत नावनोंदणी केली असून तीन परीक्षक आणि प्रेक्षक पसंती यावर विजेते जोडपे जाहीर करण्यात येणार आहे.

गुण‘ उधळागुण मिळवा

या स्पर्धेचे नियमही तसे गमतीशीर आहेत बरं. प्रत्येक जोडप्याचे 16 प्रकारांत परीक्षण करण्यात येईल आणि त्यांना 5 ते 10 पर्यंतचे गुण देण्यात येतील. रतीक्रीडेत शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक संतुलन या दोहोंची गरज असते. त्यामुळे हा ‘खेळ’ आहे आणि हा खेळ अवघ्या युरोपात खुलेआम खेळला जाईल, असे फेडरेशनचे अध्यक्ष डॅगन ब्राटीच यांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close